हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करून कोटय़वधींचा घोटाळा करणारा ‘सिटी लिमोझिन’चा प्रमुख मोहम्मद मसूद याचा जामीन उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला. मसूदला जामीन दिल्यास तो फरारी होईल तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करेल, अशी शक्यता वर्तवत न्यायालयाने त्याला जामीन नाकारला. ५०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यातील आरोपी असलेला मसूद चौकशीसाठी वारंवार बोलावूनही हजर होत नसल्याचे अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) न्यायालयाला सांगण्यात आले.
न्यायालयानेही त्यांचे म्हणणे मान्य करीत सकृतदर्शनी मसूदविरुद्ध ठेवण्यात आरोप योग्य असल्याचे दिसून येत असल्याने आणि तपास अद्याप सुरू असल्याने त्याला जामीन देणे शक्य नसल्याचे जामीन फेटाळताना स्पष्ट केले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मसूदला अटक करण्यात आली होती.
गुंतवणुकीवर ४८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून मसूदच्या कंपनीने देशभरातील हजारो लोकांना फसविले. २००९ मध्ये कंपनी बंद झाली आणि   कंपनीने दिलेले सुमारे ४२ हजार धनादेश वटलेले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा