अनिश पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईः जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसच्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) आयात करण्यात आलेले सुमारे १२२ कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. चीनवरून आलेल्या या बहुतांश कंटेनरमध्ये बंदी घातलेले चिनी फटाके, महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, मायक्रो चिप्स आणि इतर अनेक प्रतिबंधित वस्तू असल्याच्या संशय आहे. कागदोपत्री खोटी माहिती देऊन हे कंटेनर पाठवण्यात आले आहेत. सीसी टीव्हीच्या देखरेखीमध्ये कंटेनर ठेवण्याचे आदेश सीआयूकडून देण्यात आले आहेत.

‘मंडे होल्ड’ असे नाव असलेल्या या ऑपरेशनमध्ये कंटेनर फ्रेट स्टेशन्स (सीएफएस) आणि पोर्ट टर्मिनल्सच्या सर्व व्यवस्थापकांशी संबंधित कंटेनरमधील वस्तूंच्या पावत्या, त्यांचे मूल्यांकन असलेली कागदपत्रे, परीक्षण करण्यात आलेले प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व १२२ कंटेनर एकाच जहाजातून जेएनपीटी बंदरात आले आणि सध्या जेएनपीटी बंदरातील वेगवेगळ्या कंटेनर फ्रेट स्टेशन्स (सीएफएस) आणि पोर्ट टर्मिनल्सवर आहेत. यातील बहुतांश कंटेनर चीनमधून आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग उच्च न्यायालयाकडून मोकळा, भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्याची मागणी फेटाळली

सीआययूने या कंटेनर्सची तपासणी आणि स्कॅनिंग करून प्रतिबंधित चिनी फटाके आणि इतर प्रतिबंधित वस्तूंचा शोध सुरू केला आहे. गुप्तपणे ही कारवाई सुरू असून त्याची माहिती केंद्रीय यंत्रणांच्या ठरावीक अधिकाऱ्यांनाच आहे. कंटेनरची संख्या मोठी असल्यामुळे त्यांच्या तपासणीला बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. सीआययूकडून प्राप्त पत्रात नमूद करण्यात आलेल्या सर्व कंटेनरवर खूणा करून ते एकाबाजूला ठेवण्याचे काम सुरू आहे. कंटेनर फ्रेट स्टेशन्सचे आणि बंदरांचे उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत कंटेनरची तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> अमली पदार्थांची तस्करी प्रकरणी परदेशी व्यक्तीला अटक; पोटातून बाहेर काढल्या १५ कोटीच्या कोकेनच्या ७७ कॅप्सूल

नवी मुंबईतील पंजाब कॉनवेअर गोदामात आलेल्या अनेक कंटेनरच्या तपासणीदरम्यान सीमाशुल्क विभागाला या कंटेनरबाबत माहिती मिळाली होती. बंदी घातलेले चिनी फटाके आणि इतर वस्तू सापडल्या होत्या. त्यात निर्यातदाराकडून या वस्तू पाठवण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे या चीनी पुरवठादाराकडून आलेले सर्व कंटेनर थांबवण्यात आले आहेत. त्यातील काही कंटेनर सोडण्यात आले आहेत. पण इतरांची तपासणी सुरू आहे. प्रतिबंधित वस्तूंसह कर चुकवेगिरीबाबतही तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. धूर करणारे चीनी फटाके आणि फटाक्यांची आयात सीमाशुल्क नियमांनुसार प्रतिबंधित आहे. तसेच त्यांची आयात करण्यासाठी परदेशी व्यापार महासंचालनालयाकडून आयात परवाना आवश्यक असतो. भारतात वितरण आणि विक्रीसाठी प्रतिबंधित फटाके आणि फटाक्यांच्या प्रतिबंधित माल चीनमधून तस्करी केला जातो. गोदामामध्ये उच्च दर्जाचे स्कॅनर उपलब्ध आहेत. त्यानंतरही सीमाशुल्क विभाग या सर्व १२२ कंटेनरचे प्रत्यक्ष तपासणीही करणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ciu order to inspect about 122 imported containers over suspicion of chinese crackers and goods mumbai print news zws