मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध वास्तुरचनाकार, नियोजनकार, अभियंते आणि जुळ्या मुंबईचे शिल्पकार शिरीष बी पटेल यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. नगर नियोजन आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासातील त्यांचे योगदान मोलाचे होते. १९३२ मध्ये जन्मलेल्या पटेल यांनी केम्ब्रिज विश्वविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. १९६० मध्ये त्यांनी शिरीष पटेल ॲण्ड असोसिएट (एसपीए) या कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामे केली. पटेल यांनी नवनवीन बांधकाम तंत्रज्ञानांचा वापर केला. झपाट्याने विकसित होत असलेल्या महानगरांवरील ताण कमी करण्यासाठी मुंबईच्या जवळ एक नवीन शहर विकसित करण्याचा विचार एका लेखाद्वारे मांडला होता. १९६५ मध्ये चार्ल्स कोरिया आणि प्रविणा मेहता यांच्या समवेत हा विचार पुढे आणला होता. हे नवीन शहर म्हणजे आताची नवी मुंबई. १९७० ते १९७४ दरम्यान त्यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण कामे केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात आता पोलीस अधिकारी

महाराष्ट्रातील कोयना धरणाच्या कामात त्यांचे मोठे योगदान होते. तर केम्स काॅर्नर येथील भारतातील पहिल्या उड्डाणपुलाचा आराखडा त्यांनी तयार केला होता. या उड्डाणपुलाने शहर नियोजन आराखडा आणि बांधकाम क्षेत्रात मोठी क्रांती घडवली. पटेल हे भूमी संशोधन संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. तसेच हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स काॅर्पोरेशनच्या (एचडीएफसी) संचलाक मंडळाचे ते संस्थापक सदस्यही होते. गृहनिर्माण क्षेत्रातील त्यांचे कामही उल्लेखनीय आहे. पटेल यांच्या निधनाने नागर नियोजनातील एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Civil engineer urban planner shirish patel died at the age of 92 mumbai print news css