भरधाव जाणाऱ्या एका ट्रेलरच्या धडकेने माझगाव येथे एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी ट्रेलर चालकाला अटक केली आहे.
माझगावच्या नारियलवाडी दफनभूमीजवळ राहणारी आयेशा अली (२६) ही महिला सकाळी आपल्या घराजवळील रस्त्यावरून जात होती. चक्कर आल्याने अचानक ती खाली पडली. त्याचवेळी भायखळ्याहून माझगावच्या दिशेने जात असलेल्या ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली ती सापडली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यास ताबडतोब पकडले व अटक केली
माझगाव येथे ट्रेलरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
भरधाव जाणाऱ्या एका ट्रेलरच्या धडकेने माझगाव येथे एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी ट्रेलर चालकाला अटक केली आहे.
First published on: 14-11-2012 at 03:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clashed with treler women dead