मुंबई : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अखेर सोमवारी जाहीर केला़  पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. अकरावीचा अर्ज पूर्ण भरण्यासाठी आता बुधवापर्यंत (२७ जुलै) वेळ मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेने वेग घेतला असून, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक सोमवारी जाहीर केले. त्यानुसार अकरावीची पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सध्या अकरावीचा प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, अर्ज भरण्यासाठी २७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पहिल्या फेरीची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी (ता.२८) प्रसिद्ध होईल. त्यावरील हरकती, आक्षेप विचारात घेऊन त्यानुसार पहिल्या फेरीची प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे. अर्जाचा भाग दोन भरून (महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम) अंतिम केलेला अर्ज (लॉक असलेले अर्ज) प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेण्यात येणार आहेत.

राज्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याची म्हणजेच अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा ३० मे पासून उपलब्ध करून देण्यात आली तर अर्जाचा भाग दोन म्हणजेच महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया २२ जुलैपासून सुरू झाली.

कोटय़ातील प्रवेशासाठी ३० जुलैपर्यंत मुदत 

अकरावी प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्याक, संस्थांतर्गत अशा विविध कोटय़ांत प्रवेश देण्यात येतात. कोटय़ांतर्गत प्रवेशाचे प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी २७ जुलैपर्यत मुदत देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी २८ जुलैला नियमानुसार जाहीर करण्यात येईल. ही यादी जाहीर झाल्यानंतर कोटय़ातून प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी २८ ते ३० जुलै या कालावधीत मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. 

प्रक्रिया अशी..

* प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा भाग दोन भरून लॉक करणे – २७ जुलैपर्यंत

* तात्पुरती गुणवत्ता यादी  – २८ जुलै

* गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे – २८ ते ३० जुलै

* पहिल्या नियमित फेरीची प्रवेश यादी – ३ ऑगस्ट (सकाळी १० वाजता)

* मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे, प्रवेश नाकारणे – ३ ते ६ ऑगस्ट

* दुसऱ्या नियमित फेरीसाठी रिक्त जागा जाहीर – ७ ऑगस्ट

* दुसरी प्रवेश फेरी – ७ ते १७ ऑगस्ट

* तिसरी प्रवेश फेरी – १८ ते २५ ऑगस्ट

* विशेष प्रवेश फेरी – २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Class 11 admission list declare on 3rd august in maharashtra zws
Show comments