लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : स्तन कर्करोगावरील उपचार सुरू असलेल्या महिलांना रेडिओथेरपी दिली जाते. कामा रुग्णालयामधील रेडिओथेरपी केंद्रातील यंत्रे मागील वर्षभरापासून बंद असल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येते. त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. मात्र आता कामा रुग्णालयामध्ये कर्करोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. रुग्णालयातील रेडिओथेरपी केद्रांसाठी यंत्रे खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारने ३८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यांमध्ये कामा रुग्णालयामध्ये पुन्हा रेडिओथेरपी उपचार पद्धती सुरू होण्याची शक्यता आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

राज्य सरकारचे मुंबईतील कामा रुग्णालय महिला, बाल आणि प्रसूतीसाठी ओळखले जाते. कामा रुग्णालयामध्ये स्तन कर्करोगाने ग्रस्त महिलांवर उपचार केले जातात. या रुग्णांना केमोथेरपी व रेडिओथेरपी उपचार देण्याची सुविधाही रुग्णालयात होती. कामा रुग्णालयामध्ये २०२०, २०२१ आणि २०२२ या तीन वर्षांमध्ये १३ हजार ७९७ महिलांवर रेडिओथेरपी उपचार करण्यात आले होते. २०२० मध्ये ५ हजार ३५८, २०२१ मध्ये ६ हजार ४०७ महिलांवर उपचार करण्यात आले होते. मात्र मे २०२२ मध्ये रेडिओथेरपी यंत्र बंद पडल्याने या वर्षात अवघ्या २ हजार ३२ रुग्णांवर रेडिओथेरपी पद्धतीने उपचार करण्यात आले होते. कामा रुग्णालयामध्ये दरवर्षी साधारणपणे साडेपाच हजार रुग्णांवर रेडिओथेरपी करण्यात येत होती. मात्र रुग्णालयातील यंत्र बंद पडल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रेडिओथेरपीसाठी अन्य रुग्णालयामध्ये जावे लागत होते.

आणखी वाचा-‘मेट्रो २ ब’च्या तीन गाड्या मुंबईत दाखल

रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही बाब गांभीर्याने घेत तातडीने रुग्णालयामध्ये रेडिओथेरपी यंत्र उपलब्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तातडीने सूत्र हलविण्यात आली असून, कामा रुग्णालयामध्ये रेडिओथेरपी यंत्र खरेदीसाठी ३८ कोटी रुपयांस मान्यता देण्यात आली. यामध्ये नेमका कर्करोग शरीराच्या कोणत्या भागामध्ये झाले आहे, याचे निदान करणाऱ्या सी.टी. स्टिम्युलेशन टर्न की मशीनसाठी ८ कोटी रुपये, तर हाय एनर्जी लिनिअर ॲक्सीलेटर या यंत्राच्या खरेदीसाठी ३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. कामा रुग्णालयातील रेडिओथेरपी यंत्र खरेदी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांमध्ये कामा रुग्णालयामधील रेडिओथेरपी केंद्र सुरू होण्याची शक्यता असल्याचे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.