मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी समूह विकास प्रकल्पात ठाण्यातील टेकडी बंगला, किसननगर आणि हजुरी या भागातील समूह गृहनिर्माण प्रकल्प योजना राबविण्यासाठी सुमारे पाच हजार कोटी ‘महाप्रित’ या कंपनीस समभाग आणि कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभे करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रविवारी मान्यता देण्यात आली.

हेही वाचा >>> ‘झोपु’ प्रकल्पांना लवकरच वेग; रखडलेले २२८ प्रकल्प पूर्ण करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; दोन लाख सदनिकांची बांधणी

maharastrra cabinet meeting decision to complete stalled sra project in mumbai
‘झोपु’ प्रकल्पांना लवकरच वेग; रखडलेले २२८ प्रकल्प पूर्ण करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; दोन लाख सदनिकांची बांधणी
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
cluster development of industries in place of illegal constructions
बेकायदा बांधकामांच्या जागी उद्योगांचाही समूह विकास; ‘क्लस्टर’ला गती देण्यासाठी एमआयडीसी-महापालिकेची साडेबारा टक्के योजना
possibility of traffic congestion due to the ceremony at ISKCON temple
ठाणे : इस्कॉन मंदिरातील सोहळ्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता
Thane Khadi Coastal Road Project,
ठाणे खाडी किनारा मार्ग प्रकल्प : प्रकल्पासाठीचे ९२ टक्के भूसंपादन पूर्ण, उर्वरित आठ टक्के भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती

ठाण्यातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसन नगर भागातील समूह विकास प्रकल्प योजना राबविण्याकरिता सहा हजार कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. यापैकी पाच हजार कोटी रुपये कर्जरोखे अथवा समभागाच्या माध्यमातून उभे करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. हे तिन्ही प्रकल्प मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. यापैकी दोन प्रकल्प हे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील आहेत. कर्जरोख्यातून निधी उभा करण्यात आल्याने या प्रकल्पांसाठी निधीची चणचण भासणार नाही.

भिवंडी येथे चाविंद्रे व पोगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिका, चंद्रपूरमधील म्हाडाच्या कोसरा येथील सदनिका, यवतमाळ व वडगावमधील सदनिका, ठाणे, नागपूर व पुणे महानगरपालिकांमध्ये अक्षय ऊर्जा प्रकल्प, मुंबई महानगरात ईव्ही पार्क, मेडीसिटी, रसायन केंद्र, डिजिटल विद्यापाठी असे प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.