मधु कांबळे
राजस्थानातील काँग्रेसमधील बंडखोरीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे नेते सावध झाले आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे बहुमत असले तरी कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या समवेत तिन्ही पक्षांच्या आमदारांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली आहे. सत्ताधारी आमदारांमध्ये नाराजी, असंतोष आहे का, याची चाचपणी केली जात असल्याचे समजते.
यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता, आमदारांशी चर्चा सुरू केली आहे, अशी त्यांनी माहिती दिली. मात्र ही नियमित प्रक्रिया आहे, राजस्थानमधील राजकीय घडोमाडीशी त्याचा काही संबंध नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एरव्ही अधिवेशन असते, त्यावेळी आमदारांच्या एकत्र बैठका घेऊन बोलता येते, आता तशी परिस्थिती नाही, त्यामुळे दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून बैठका घेतल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
राजस्थामध्ये राजकीय घडामोडी सुरू होताच, महाराष्ट्रतही चर्चा सुरू झाली. राज्यातील ठाकरे सरकार आम्ही पाडणार नाही, परंतु ते अंतर्गत वादानेच पडेल, असे सूचक विधान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप नेत्यांच्या विधानांवर ठाकरे सरकार पाडून दाखवा, असे सत्ताधारी आघाडीतून आव्हानही देण्यात आले. मात्र तरीही सावध झालेल्या आघाडीच्या नेत्यांनी तिन्ही पक्षांच्या आमदारांशी चर्चा सुरू केली आहे.
विदर्भातील आमदारांशी चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात व जयंत पाटील यांनी शनिवारी रात्री दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पहिल्यांदा विदर्भातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी वैयक्तिक चर्चा केली. या वेळी विदर्भातील तीनही पक्षांचे मंत्री सहभागी झाले होते. या नेत्यांनी करोनाची परिस्थिती, पाऊसपाणी, स्थानिक प्रश्न, याबद्दल आमदारांकडे विचारपूस केली. पुरेसा विकास निधी मिळत नाही, मंत्रिस्तरावर कामे होत नाहीत, अशा नेहमीच्या तक्रारी बहुतांश आमदारांच्या होत्या. काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबतही आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. ही चर्चा रात्री दोन वाजता संपल्याचे सांगण्यात आले. पुढच्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण व मुंबईतील आघाडीच्या आमदारांशी चर्चा केली जाणार आहे.