Devendra Fadnavis At Loksatta Varshavedh : जगातील महत्त्वाच्या घटनांचे कुतूहल असणाऱ्यांना उपयुक्त ठरणारा ‘लोकसत्ता – वर्षवेध’चा अंक आज (४ फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. यामध्ये २०२४ या वर्षांत घडलेल्या सर्व घटना आणि या वर्षाचे खास मानकरी असा भरगच्च वाचनानंद देणारा मजकूर या अंकात असणार आहे. लेखक, पत्रकार, विश्लेषक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि माहिती संग्राहकांसाठी गेल्या दशकभरापासून ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून ‘वर्षवेध’ पुस्तकाचा उपक्रम राबविला जातो.

पहिल्या वर्षापासूनच प्रचंड प्रतिसादामुळे या पुस्तकाचे पुनर्मुद्रण केले जाते. यंदा पूर्णपणे नव्या स्वरूपात हा वाचकांच्या हाती येणार आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींइतक्याच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील संपूर्ण वर्षभरातील महत्त्वपूर्ण घटना यात अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. अर्थ, शेती, हवामान, मनोरंजन, क्रीडा आदी विविध विषयांतील निवडक दहा घटनांचे विश्लेषण यात आहे.

दरम्यान, तसेच अमेरिकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर पुन्हा आलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदी महत्वाच्या मान्यवरांचे लेख हे यंदाच्या ‘वर्षवेध’चे खास आकर्षण असणार आहे.

Story img Loader