मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) राज्य सरकारने विविध उद्याोगसमूह आणि बड्या कंपन्यांशी सुमारे नऊ लाख ३१ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह देशभरातील कंपन्या राज्यात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असून ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’मुळे कंपन्यांची महाराष्ट्राला अधिक पसंती आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्यात आर्थिक गुंतवणुकीचा ओघ वाढत असून रिलायन्स उद्याोगसमूहाने तीन लाख पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले आहेत. त्यातून तीन लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. ही गुंतवणूक पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, अपारंपरिक ऊर्जा, जैवऊर्जा, हरित हायड्रोजन, हरित रसायने, औद्याोगिक क्षेत्र विकास, किरकोळ व्यवसाय, डाटा सेंटर, दूरसंचार, आदरातिथ्य उद्याोग आणि बांधकाम क्षेत्रात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित नवभारत उभारणीच्या संकल्पनेला हातभार लावण्यासाठी रिलायन्स उद्याोगसमूह कटिबध्द असल्याचे कंपनीच्या ऊर्जा व्यवसायाचे प्रमुख अनंत अंबानी यांनी सांगितले.

maharashtra air tourism loksatta
Heli Tourism : राज्यात ‘हवाई पर्यटना’ला चालना
no alt text set
शिवाजी पार्क मैदानातील धुळीवर नियंत्रणासाठी आता वाऱ्याच्या वेगाचा…
Three policemen injured during action against illegal huts in Jogeshwari Mumbai print news
जोगेश्वरीत अवैध झोपड्यांवरील कारवाईदरम्यान तीन पोलीस जखमी; परिसरात तणावाचे वातावरण
BEST Kamgar Sena demands immediate closure of bus services on rental basis under BEST initiative
बेस्ट उपक्रमातील भाडेतत्वावरील बसगाड्यांची सेवा तत्काळ बंद करावी; बेस्ट कामगार सेनेची पालिका प्रशासनाकडे मागणी
smart projects, World Bank, World Bank news,
‘स्मार्ट प्रकल्पां’च्या ढिसाळपणावर जागतिक बँकेचे ताशेरे
Saif Ali Khan private security increased after attack Mumbai news
हल्ल्यानंतर सैफ व करीना दोघांनाही सुरक्षा; खासगी सुरक्षेतही वाढ
Construction of large water channels begins in Gorai Mumbai news
गोराईमध्ये मोठ्या जलवाहिन्या टाकण्यास सुरुवात; काही गावांमध्ये पालिकेच्या कामाला विरोध
Shiv Sena demands cancellation of convenience charges in gas payments Mumbai print news
गॅस देयकातील सुविधा शुल्क रद्द करण्याची शिवसेनेची मागणी
1 5 lakh senior citizen treated by the Maharashtra state public health department Mumbai print news
वृद्धापकाळातील आरोग्य सेवा गतिमान करणार! वर्षभरात साडेदहा लाख वृद्धांवर उपचार…

हेही वाचा :Heli Tourism : राज्यात ‘हवाई पर्यटना’ला चालना

भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट साध्य करताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरवर नेऊन हातभार लावण्याच्या फडणवीस यांच्या प्रयत्नांची अंबानी यांनी या वेळी प्रशंसा केली.

उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची भेट

एनटीटी डाटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत दुबे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. महाराष्ट्रात एक गिगावॅट क्षमता असलेली ‘एनटीटी’ कंपनी डाटा सेंटर उद्याोगात अग्रेसर असून उद्याोगवाढीतील संधींबाबत ही बैठक झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल्सबर्ग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अरुप अँडरसन यांच्याशी चर्चा केली असून, समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली आहे. रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे मुख्य संचालक एमए युसुफ अली यांनी नागपूरमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा :जोगेश्वरीत अवैध झोपड्यांवरील कारवाईदरम्यान तीन पोलीस जखमी; परिसरात तणावाचे वातावरण

फिनलंडच्या वाणिज्यमंत्र्यांशी चर्चा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. फडणवीस यांनी फिनलंडचे वाणिज्यमंत्री विले ताविओ यांची भेट घेऊन महाराष्ट्र-फिनलंडमधील व्यापारी संबंधांबाबत चर्चा केली. फिनलंडमध्ये ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र रोडशो’चे आयोजन करण्यात येणार असून हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, रसायने, खते क्षेत्रात गुंतवणुकीबाबत उभयपक्षी सहकार्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

Story img Loader