मुंबई : बीड प्रकरणातील फरारी आरोपींची संपत्ती व मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले. त्याचबरोबर बंदुकी-पिस्तुले दाखवीत छायाचित्रे काढलेल्या बीडमधील नेत्यांचे व धनदांडग्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फडणवीस यांनी बीड येथील गुन्हेगारी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाचा आढावा घेतला. याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी तपास करीत आहेत. काही आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरारी असून त्यांचा छडा तपास पथकांना लागलेला नाही. त्यामुळे या फरारी आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांना दिले, असे गृह खात्यातील उच्चपदस्थांनी सांगितले. त्याचबरोबर बीडमधील वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्याबाबतही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या.

शस्त्रपरवाने रद्द करण्याचे आदेश

बीड जिल्ह्यात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रपरवाने देण्यात आले आहेत. राजकीय नेते, कार्यकर्ता, धनदांडगे व इतरांकडून गुंडगिरी व दहशत दाखविण्यासाठी त्याचा वापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही जणांनी बंदुका-पिस्तुले दाखवीत छायाचित्रे काढली आहेत व ती समाजमाध्यमांवर टाकली आहेत, हवेत गोळीबार करीत असल्याची चित्रीकरणे केली आहेत. त्यातून बीड जिल्ह्यात राजरोसपणे गुंडगिरी व दहशत असल्याचे चित्र असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांची छायाचित्रे उपलब्ध आहेत, ती तपासून संबंधितांचे शस्त्रपरवाने रद्द करण्याचे आदेश फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. शस्त्रपरवान्यांचा आढावा घेवून गरज नसलेल्यांचे परवाने तातडीने रद्द करण्याचे निर्देश त्यांनी दिले.