मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) मंगळवारी पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी चार लाख ९९ हजार ३२१ कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले. या गुंतवणुकीमुळे राज्यात सुमारे ९२ हजार २३५ इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. या गुंतवणुकीतील सर्वात मोठी गुंतवणूक जेएसडब्ल्यू उद्याोगसमूहाने तीन लाख कोटी रुपयांची केली आहे. ती स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स आदी क्षेत्रात करण्यात आली आहे.
या गुंतवणुकीमुळे राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले. उद्याोगमंत्री उदय सामंत, उद्याोगपती सज्जन जिंदाल यांच्यासह अनेक उद्याोगपती, कंपन्यांचे उच्चपदस्थ व शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्याोगसमूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्या उपस्थितीत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. पहिला करार गडचिरोलीत स्टील उद्याोगासाठी करण्यात आला.
हेही वाचा : एसटीच्या कंत्राटी बस निविदा रद्द, नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
‘बालासोर’कडून १७ हजार कोटींची गुंतवणूक
‘बालासोर अॅलाईज कंपनी’ने स्टील व धातू उद्याोगात सुमारे १७ हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला असून त्यातून ३२०० रोजगारनिर्मिती होणार आहे. फडणवीस व बालासोर अॅलाईजचे सतीश कौशिक
यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ने संरक्षण क्षेत्रात १६ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला असून त्यातून २४५० रोजगारनिर्मिती होणार आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सतीश सेठ यावेळी उपस्थित होते. विराज प्रोफाईल्स कंपनीने १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा करार केला ही गुंतवणूक स्टील व धातू उद्याोगात होणार आहे आणि त्यातून ३५०० रोजगारनिर्मिती होईल. या सामंजस्य कराराच्या वेळी फडणवीस यांच्यासमवेत विराज प्रोफाईल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नीरज कोचर उपस्थित होते. कल्याणी उद्याोगसमूह संरक्षण, स्टील आणि विद्याुतवाहने क्षेत्रात पाच हजार २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून चार हजार रोजगारनिर्मिती होईल. कल्याणी उद्याोगसमूहाचे उपाध्यक्ष अमित कल्याणी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
‘ फ्युएल ’ अर्थात ‘ फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज ’ यांच्याशीही सामंजस्य करण्यात आला असून ते राज्यातील पाच हजार तरुणांना कृत्रिम तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या उच्चपदस्थांशी भेटीगाठी
फडणवीस यांनी मास्टरकार्डचे एशिया पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष लिंग हाय यांची भेट घेवून चर्चा केली. मास्टरकार्डने पुणे येथील तांत्रिक केंद्र पुन्हा सुरु केले आहे. फडणवीस यांनी इंटरनॅशनल अॅमसीए अँड इंटरनॅशन बिवरेजेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यूजीन विल्यमसन आणि पेप्सिकोचे स्टीफन किहो यांच्याशीही चर्चा केली. पेप्सिको नाशिकजवळ उत्पादन मूल्य साखळी उभारणार असून राज्यात उद्याोगवाढीचे नियोजन करीत आहे.
फान्समधील कृषी व अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय जहाजवाहतूक व अर्थ उद्याोगात अग्रेसर असलेल्या लुईस ड्रेफस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल गेलची यांच्याशी विविध मुद्द्यांवर महत्वपूर्ण चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
राज्य सरकारने विविध उद्याोगसमूह व कंपन्यांशी केलेले सामंजस्य करार एकूण : ४,९९,३२१ कोटी रुपये
१) कल्याणी समूह
क्षेत्र : संरक्षण, स्टील, विद्याुत वाहने गुंतवणूक : ५२०० कोटी
रोजगार : ४००० कोणत्या भागात : गडचिरोली २) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
क्षेत्र : संरक्षण गुंतवणूक : १६५०० कोटी
रोजगार : २४५० कोणत्या भागात : रत्नागिरी ३) बालासोर अलॉय लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स गुंतवणूक : १७००० कोटी
रोजगार : ३२०० ४) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स गुंतवणूक : १२००० कोटी
रोजगार : ३५०० कोणत्या भागात : पालघर
५) एबी इनबेव क्षेत्र : अन्न आणि पेये गुंतवणूक : ७५० कोटी
हेही वाचा : जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण : आरोपीच्या मानसिक स्थितीची ठाणे मनोरुग्णालयात तपासणी करा – न्यायालय
रोजगार : ३५ कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर ६) जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स गुंतवणूक : ३,००,००० कोटी
रोजगार : १०००० कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली ७) वारी एनर्जी
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे गुंतवणूक : ३०००० कोटी
रोजगार : ७५०० कोणत्या भागात : नागपूर ८) टेम्बो क्षेत्र : संरक्षण गुंतवणूक : १००० कोटी
रोजगार : ३०० कोणत्या भागात : रायगड ९) एल माँट क्षेत्र : पायाभूत सुविधा गुंतवणूक : २००० कोटी
रोजगार : ५००० कोणत्या भागात : पुणे
१०) ब्लॅकस्टोन क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान गुंतवणूक : २५००० कोटी
रोजगार : १००० कोणत्या भागात : एमएमआर
११) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी क्षेत्र : डेटा सेंटर्स गुंतवणूक : २५००० कोटी
रोजगार : ५०० कोणत्या भागात : एमएमआर
१२) अवनी पॉवर बॅटरिज क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणूक : १०५२१ कोटी
रोजगार : ५००० कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर १३) जेन्सोल क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स गुंतवणूक : ४००० कोटी
रोजगार : ५०० कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर १४) बिसलरी इंटरनॅशनल क्षेत्र : अन्न आणि पेये गुंतवणूक : २५० कोटी
रोजगार : ६०० कोणत्या भागात : एमएमआर
१५) एच टू ई पॉवर
क्षेत्र : हरित ऊर्जा गुंतवणूक : १०,७५० कोटी
रोजगार : १८५० कोणत्या भागात : पुणे
१६) झेड आर टू समूह
क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स गुंतवणूक : १७५०० कोटी
रोजगार : २३००० १७) ब्ल्यू एनर्जी मोटर्स
क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही गुंतवणूक : ३५०० कोटी
रोजगार : ४००० कोणत्या भागात : पुणे
१८) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने) क्षेत्र : हरित ऊर्जा गुंतवणूक : ८००० कोटी
रोजगार : २००० १९) बुक माय शो
क्षेत्र : करमणूक गुंतवणूक : १७०० कोटी
रोजगार : ५०० कोणत्या भागात : एमएमआर
२०) वेल्स्पून क्षेत्र : लॉजिस्टीक गुंतवणूक : ८५०० कोटी
रोजगार : १७३००