गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली. मात्र, निकालात भाजपाला मोठं यश मिळताना दिसत आहे. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन केलं. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि गुजरातच्या नागरिकांचं अभिनंदन करतो. एक चांगला निकाल आला आहे. भाजपाला गुजरातमध्ये १५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीमही गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले होते. त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करत आणि सर्वांना शुभेच्छा देतो.”

Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Gulabrao Patil insta
जळगावचं पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांकडेच? घोषणेआधीच मोठं वक्तव्य; विरोधकांना दमबाजी करत म्हणाले…
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

“मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे”

“मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे. आज आपल्याला जी-२० चं अध्यक्षपदही मिळालं आहे. हे आपल्या देशासाठी गौरवास्पद आहे. जी-२० चं नेतृत्व मोदींनी करणं हीदेखील देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातही मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये १४ बैठका आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं ब्रँडिंग करण्याची संधी प्राप्त झाली आहे,” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

गुजरातची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार का?

गुजरातची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना विचारला. त्यावर ते म्हणाले, “आज आम्ही महाराष्ट्रात भरपूर काम करत आहोत. मुंबईचं सुशोभिकरण सुरू आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर करून कायापालट झाला पाहिजे. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे.”

हेही वाचा : Gujarat Election Results 2022 Live : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाच, १५० चा आकडा पार करणार, काँग्रेसचा दारुण पराभव; वाचा प्रत्येक अपडेट

“…म्हणून आम्ही सरकार बदललं”

“मुंबईत देशातील-विदेशातील पर्यटक येतात. त्यांना ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या त्या दुर्दैवाने आजपर्यंत मिळाल्या नाहीत. म्हणून आम्ही सरकार बदललं. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारं सरकार आहे. मुंबईचाही कायापालट झाला पाहिजे. म्हणून आम्ही स्वच्छता आणि सुशोभिकरणाला प्राधान्य दिलं. लवकरच हे दृश्य स्वरुपात दिसेल आणि मुंबईकरांना लाभ होईल,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

Story img Loader