उद्योगपती रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते यंदाचा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. टाटा यांच्या मुंबईतील ‘हालकाई’ बंगल्यात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शाल पुष्पगुच्छ, उद्योगरत्न पुरस्कारानचे सन्मानचिन्ह, २५ लाख रुपयांचा धनादेश आणि खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोट्रेट त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केले.

हेही वाचा : विश्लेषण : यंदा १३ खासदारांचा संसदरत्न म्हणून सन्मान, या पुरस्काराचं महत्त्व काय? तो कोणत्या खासदारांना दिला जातो; जाणून घ्या

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे हेदेखील उपस्थित होते.