मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत उत्तरवाहिनी मार्गिका आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू यांना जोडणाऱ्या पुलामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर, सुसह्य आणि वेगवान होणार आहे. वाहतूक कोंडीतून सुटका होऊन नागरिकांना कुटुंबियांसमवेत अधिकचा वेळ देता येणार आहे. प्रवासाचा वेळ वाचल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमतादेखील वाढणार आहे. तसेच, या पुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण संरचनेमुळे परदेशात आल्याचा भास होतो, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी काढले.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत उत्तरवाहिनी मार्गिकेसाठी किनारी रस्ता आणि सागरी सेतूला जोडणारा पूल गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत खुला करण्यात येत आहे. या पुलाच्या पाहणीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Will Deputy Chief Minister Eknath Shinde succeed in retaining post of Guardian Minister of Thane
अजित पवारांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवणार का?
Eknath Shinde
“…तर त्यांना चोप दिला जाईल”, कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंकडून श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला; म्हणाले, “दुसऱ्या टप्प्यात…”
Deputy Chief Minister Eknath Shinde visited Smriti Mandir premises and talk about RSS
एकनाथ शिंदे म्हणाले, “संघाकडून निस्वार्थ भावनेने काम कसे करावे…”
Eknath Shinde
Eknath Shinde On RSS : “संघाच्या शाखेतूनच माझी सुरूवात…”; आरएसएस मुख्यालयात पोहचताच एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

हेही वाचा >>> जमिनी मोकळ्या करा!केंद्र सरकारी भूखंडांबाबत नीती आयोगाची शिफारस, सात वर्षांत ११ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे आव्हान

उत्तरवाहिनी मार्गिकेकरिता किनारी रस्ता आणि सागरी सेतूला जोडणारा पूल १५ सप्टेंबर २०२४ रोजी नागरिकांना उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने मुदतीपूर्व दोन दिवस अगोदरच हा पूल नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून दिला. ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असे शिंदे म्हणाले. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. त्याचबरोबर वेळेची, इंधनाची बचत होणार आहे. तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषणातही घट होणार आहे. मुंबई प्रदूषणमुक्त करणे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून देश-विदेशातून हजारो पर्यटक मुंबईत येतात. मुंबईच्या विकासात गतीने बदल घडत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार असून त्यानंतर खड्डेमुक्त प्रवासाचा अनुभव मुंबईकर घेतील. तसेच, कोळी-आगरी बांधवांच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून किनारी रस्ता प्रकल्पाला गती दिली जात असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader