मुंबई : मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक जाळ्या बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे, यास आमचे प्राधान्य आहे. तर दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुंबई मुक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली.

हेही वाचा >>> गोंधळाची चाहूल; विद्यामान विधानसभेचे अखेरचे अधिवेशन आजपासून

Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
stalled housing projects in mumbai will be completed in phased manner says dcm eknath shinde
मुंबई बाहेर फेकले गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
Thane , Eknath Shinde , Uddhav Thackeray group,
आरोप, शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
Eknath shinde bjp loksatta
एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळेच पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती

मुंबईत निसरड्या डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांमधून अनेक कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या झोपड्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो. मुंबईत अशी सुमारे २०० ठिकाणे आहेत. यापैकी काही ठिकाणे अतिधोकादायक आहेत. दरड कोसळण्याची शक्यता असलेली सर्वाधिक ठिकाणे पूर्व उपनगरात आहेत. त्यापैकी घाटकोपर येथील आझाद नगर परिसरातील अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या व संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संरक्षक जाळी बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी केली. मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. संभाव्य ३१ ठिकाणी दरडप्रवण क्षेत्राची स्थिती पाहता अत्याधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात ३१ ठिकाणी सर्वेक्षणाचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज कामाची पाहणी केली.

धोकादायक इमारतींबाबत धोरण

मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सुरक्षा जाळ्या बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करण्यास आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेण्यास प्राधान्य आहे. दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुंबई मुक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर म्हाडा, महापालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याचे अश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी घाटकोपर येथे दिले.

Story img Loader