मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर सामान्यपणे मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्र्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्या जास्त असते. आपली वेगवगेळी कामं घेऊन मंत्र्यांना भेटायला आलेल्यांची भेट घेण्यासाठी नियोजित वेळ ठरवून दिलेली असते. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या सामान्य नागरिक मंत्र्यांना भेटायला येतात. अनेकदा मंत्रालयातील नियोजित वेळ निघून गेल्यानंतरही कामासाठी भेटीला आलेल्यांची मोठी रांग मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर दिसून येतं. असाच काहीसा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शुक्रवारी घडला. त्यामुळेच रात्री साडेआठ पर्यंत मुख्यमंत्री शिंदे मंत्रालयामधील त्यांच्या दलनामध्ये सामान्यांना भेट देत होते. विशेष म्हणजे कालच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्यांची गर्दी अधिक असल्याने ‘ओव्हरटाइम’ करावा लागला.

नक्की वाचा >> BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पदाची शपथ घेतल्यापासून ते, “मी सामान्यांचा मुख्यमंत्री आहे, असे वेगवेगळ्या भाषणांमध्ये आणि कार्यक्रमांत सांगत असतात. सामान्यपणे मंत्रालयामध्ये प्रत्येक खात्याच्या मंत्र्याला शहरी, ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवा वर्गातील लोक कामांसाठी भेटायला येत असतात. असाच प्रकार सध्या मुख्यमंत्री शिंदेंसोबत घडतोय. मंत्रीमंडळ बैठकीच्या दिवशी मुख्यमंत्री आणि इतर मंत्री आवर्जून मंत्रालयात असल्याने जास्तच गर्दी दिसून येते. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना भेटण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं येतात. त्यांची निवेदने स्वीकारून म्हणणे ऐकून घेतले जाते.

नक्की वाचा >> ‘सिल्व्हर ओक’वर हल्ला प्रकरणातील ११८ निलंबित ST कर्मचाऱ्यांना CM शिंदेंनी पुन्हा सेवेत घेतलं: शरद पवार म्हणाले, “सरकारचा निर्णय…”

शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी नियोजित परिवहन विभाग, मीरा भाईंदर महापालिका विकास कामांचा आढावा, कोळी बांधवांच्या समस्यांबाबत बैठका घेतल्या. त्यानंतर सायंकाळी विलेपार्ले येथे मुख्यमंत्र्यांचा नियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी मंत्रालयाबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी भेटीसाठी आलेल्या अनेकांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ सर्वांची भेट घेतली. सायंकाळचे पावणे आठ वाजले तेव्हा नियोजित कार्यक्रमाबद्दल त्यांना आठवण झाली. मात्र आपल्याला भेटायला समिती कक्षाबाहेर किमान दीडशे ते दोनशे नागरिक उपस्थित असल्याचे त्यांना कळले.

नक्की वाचा >> आईवरुन शिव्या प्रकरण: “चंद्रकांत पाटील कोल्हापूरकरांची माफी मागा, नीच वक्तव्य करुन…”; राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी संतापले

नियोजित कार्यक्रम असला तरी सामान्यांना न भेटताच कसं जायचं असा विचार करुन त्यांनी सगळ्यांना भेटायचं ठरवलं. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात मुख्यमंत्री आले. त्यांनी समस्या घेऊन आलेल्या प्रत्येकाची भेट घेतली. निवेदने स्वीकारली. त्यावर सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी सूचनाही लिहिल्या. सर्वांची भेट घेऊन झाल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री मंत्रालयातून नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले.

Story img Loader