राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या चालू असून त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये निरनिराळ्या मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात नुकत्याच पार पडलेल्या नागालँड विधानसभा निवडणुकांनंतर राष्ट्रवादीनं भाजपाप्रणीत आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या हाती आयतं कोलीत आल्याचं बोललं जात आहे. या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटल्याचं पाहायला मिळालं. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित होताच संतापलेल्या अजित पवारांना एकनाथ शिंदेंनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

गुलाबराव पाटलांच्या विधानामुळे अजित पवार संतापले

कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालँड निवडणुकीचा मुद्दा उपस्थित करताच अजित पवार चांगलेच भडकले. “मंत्रीमहोदयांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. गुलाबराव पाटलांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायला हवं असं नाहीये. राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना. ही कुठली पद्धत काढली? तुमच्या हातात आहे ना? मग करा ना चौकशी. कारण नसताना कुणावरही कसलेही आरोप का करताय?” असा सवाल अजित पवारांनी केला.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”

छगन भुजबळांची मध्यस्थी

“मंत्री चुकीची माहिती सभागृहात देत आहेत. राष्ट्रवादीकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की नागालँडमध्ये स्थानिक पक्षाचे मुख्यमंत्री रिओ यांना पाठिंबा देण्यात आलाय. भाजपाला नाही. हे तर बेगानी शादी में अब्दुल्लाह दिवाना असं चाललंय. तिकडे रिओ मुख्यमंत्री आहेत. भाजपाचा काहीही संबंध नाही”, असं म्हणत छगन भुजबळांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. यानंतर चुकीचे दावे कामकाजातून वगळले जातील, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

“दुसऱ्याकडे बोट दाखवताना…”

“अजितदादा, गुलाबराव पाटलांनी नागालँडचा विषय काढला, तो आजचा विषय नव्हता खरंतर. पण जसं तुम्ही दररोज येऊन खोके खोके करता.. ऐका.. तुम्हीही ऐकायची सवय करा. एवढंच आहे की जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो, तेव्हा तीन बोटं आपल्याकडे असतात. तुम्ही आत्तापर्यंत बोलत होतात की बदलाचे वारे वाहात आहेत. गुलाबराव पाटलांनी एवढंच विचारलं की हे बदलाचे वारे आहेत का?” असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.

गुलाबराव पाटलांनी नागालँडचा मुद्दा काढताच अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यांना आम्ही ओळखतो, प्रत्येक गोष्टीत…!”

“भुजबळसाहेब, तुम्ही काय म्हणालात? मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला. म्हणजे सरकारला नाही, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला. हे कुठलं तत्वज्ञान? आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून. असं कसं चालेल? शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत. ते आत्तापर्यंत जे काही बोलले, त्याच्या नेमकं उलटं घडलंय हे आपल्याला माहिती आहे. कसब्याची पोटनिवडणूक जिंकली पण त्याचवेळी तीन राज्य भाजपानं जिंकली हे शरद पवार विसरले”, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.

एकनाथ शिंदेंनी करून दिली २०१४ ची आठवण!

“तुम्ही म्हणालात की सर्वसामान्य लोकांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवली. मग पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसामान्य नव्हते का? त्यांनी तर तुमच्या बालेकिल्ल्यात तुम्हाला जागा दाखवली. अजितदादा, तसे तुम्ही चांगले आहात. रोखठोकमध्ये आहात. पण तुम्ही जाणीवपूर्वक बोलता. समोरच्याला बरोबर लागेल असं. पण तसं होत नाही. नागालँडमध्ये पाठिंबा न मागताही तुम्ही दिला. २०१४लाही तुम्ही इथे ते केलं होतं. त्याामुळे शीशे के घरों में रहनेवाले दुसरों के घरोंपर पत्थर नहीं फेंका करते. सगळ्या गोष्टी प्रत्येकाकडे असतात. आम्ही बोलत नाही. पण समोरूनही रोज रोज तुम्ही बोलत राहाल, तर उत्तर मिळणार”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं.

Story img Loader