राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा बुधवारी बीकेसी मैदानावर पार पडला. या मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना लोक उठून निघून जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याचा व्हिडीओंवरुन विरोधकांनी खोचक शब्दांमध्ये टीका टीप्पणी सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या व्हायरल व्हिडीओंवर आणि भाषण सुरु असताना लोक निघून गेल्याच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात होणाऱ्या या टीकेला उत्तर दिलं. “आमच्यासाठी बाळासाहेब वंदनीय आहेत. आम्ही त्यांना आमचं दैवतच मानतो. कोणी कितीही काही म्हटलं तरी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. याच कारणामुळे राज्याबरोबरच देशभरातील लोक आम्हाला सोबत करत आहेत,” असं शिंदे यांनी म्हटलं. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, “कोणी ते व्हिडीओ व्हायरल केले ट्वीस्ट करुन. ते जाऊ द्या. पण शेवटी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं. बीकेसीमध्ये किती लोक आले होते? का आले होते? जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर एवढी लोकं समर्थनाला आली असती का?” असंही मुख्यमंत्री म्हणाले. इतकच नाही तर बीकेसीवर दोन लाखांहून अधिक लोक जमली होती असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

नक्की वाचा >> Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

बुधवारी पार पडलेल्या या मेळाव्यामध्ये शिंदे यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने ठाकरे कुटुंबाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण जवळजवळ दीड तास सुरु होते. रात्री साडेआठच्या आसपास मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि ते दहा वाजेपर्यंत बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या या लांबलेल्या भाषणादरम्यान बीकेसीच्या मैदानामध्ये सभेसाठी जमलेला जमाव हळूहळू सभास्थळावरुन काढता पाय घेत असल्याचं चित्र दिसून आलं.

नक्की वाचा >> Dasara Melava : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विचार ही नाही आणि…”

मात्र मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण फारच लांबलं. अनेक मुद्द्यांना हात घालताना मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या भाषणातील मुद्दे बऱ्याच वेळा समोर ठेवलेल्या कागदांवरुन वाचून दाखवताना दिसले. तसेच अनेकदा ते घड्याळाकडेही पाहताना दिसले. दहा वाजल्यानंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येत नाही या नियमामुळेच मुख्यमंत्री अनेकदा वेळ तपासून पाहत होते अशी चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on dasara melava video of people leaving ground when he was delivering a speech scsg