Cm Eknath Shinde On Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. आज रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वांद्रे येथील निर्मल नगर परिसरात हा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आता राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच या या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही दुर्दैवी घटना आहे. मी पोलिसांबरोबर चर्चा केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक उत्तर प्रदेशचा, तर दुसरा हरियाणाचा आहे. एक आरोपी फरार आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थिती कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मी पोलिसांना दिले आहेत. तसेच कोणताही गॅंग डोक वर काढणार नाही, याची खबरदारी घेण्याचा सुचनाही पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होईल, असंही आश्वासनही त्यांनी दिलं.

Arvind Kejriwal
हरियाणातील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आजच्या निकालातून…”
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
Hitendra Thakur, Rajiv Patil, Hitendra Thakur latest news,
प्रत्येकाला स्वत:ची मते असतात – हितेंद्र ठाकूर; राजीव पाटील पक्षांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया
Supriya Sule
Supriya Sule : “दीड ते दोन महिन्यांत आपल्याच विचारांचं सरकार…”, सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं विधान
Ajit Pawar demand to BJP regarding the post of Chief Minister print politics news
मुख्यमंत्रीपद ‘फिरते’ हवे? अजित पवार यांची भाजपकडे मागणी
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…

हेही वाचा – Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दिकींची गोळ्या झाडून हत्या; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, “हरियाणा व उत्तर प्रदेश…”

बाबा सिद्दीकींची हत्या नेमकी कशी झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर गोळीबार केला आणि त्यानंतर हे तिघंही तिथून पसार झाले. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यामागचं कारण काय होतं?याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा – बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”

कोण होते बाबा बाबा सिद्दीकी?

बाबा सिद्दीकी हे १९९९, २००४ व २००९ मध्ये असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यांना २००४ ते २००८ या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिली होती. अर्थसंकल्प असो, पुरवणी मागण्या असो, की विशेष चर्चा असा मुंबईचे प्रश्न विशेषतः झोपडपट्ट्यांचे, चाळींचे, नागरी सुविधांचे प्रश्न ते हिरिरीने मांडत असत. २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढविली नाही, परंतु आपल्या मुलाला झिश्यान सिद्दीकी याला मतदंरसंघ बदलून वांद्रे पूर्वमधून निवडून आणले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी ओळखले जात असत. त्या पार्ट्यांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त यांच्यासारखे बॉलिवूड स्टार्स जात असत.