मुंबईतील वादळामुळे घाटकोपरच्या पूर्व द्रुगती मार्गावरील पेट्रोल पंपावर मोठं लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच आतापर्यंत ६७ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

ही घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेची माहिती मिळताच मी लगेच मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याठिकाणी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. तसेच बचावकार्य सुरू आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
4 Naxalites killed 1 policeman martyred in encounter in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये चकमक ४ नक्षली ठार, एक पोलीस शहीद
pistol 28 cartridges seized from passenger at pune airport
पुणे विमानतळावर प्रवाशाकडून २८ काडतुसे जप्त
Ajnup Gram Panchayat , Shahapur Taluka,
ठाणे : जमिनीच्या वादातून माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला
thane coastal road contract scam,
अन्वयार्थ : निर्दोषत्व सिद्ध व्हावे!

मुंबईतील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुढे बोलताना मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आम्ही आयुक्तांना दिले आहेत. तसेच जे होर्डिंग अनाधिकृत आहेत, त्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही आम्ही आयुक्तांना दिले आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा – मुंबईत धुळीच्या वादळाचं तांडव; पेट्रोल पंपावर ५ सेकंदात कोसळलं लोखंडी होर्डिंग, लोकांच्या किंकाळ्या अन्…LIVE VIDEO व्हायरल

मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारद्वारे आर्थिक मदत देणार असल्याची माहिती दिली. या घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असून या घटनेत ज्यांच्या मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री साहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितलं.

उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ६७ नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. तसेच या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून याप्रकरणी दोषी आढळल्या त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ते म्हणाले.

Story img Loader