शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ( १८ जून ) कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं होतं. याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “एक नोटीस आली, तेव्हा XXX पातळ झाली होती. त्यामुळे आपल्या मर्यादेत राहा,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
“कालच्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांना किती शिव्या दिल्या. अब्दाली, हिटलर, अफजल खान म्हटलं. अरे ते कुठं, तुम्ही कुठं… सर्व राज्याने पाहिलं आहे, जेव्हा एक नोटीस आली, तेव्हा XXX पातळ झाली होती. नंतर मोदींना भेटण्यासाठी गेला. शिष्टमंडळ बाहेर ठेवलं आणि शिष्टाई आतमध्ये गेली. आम्हाला सर्व माहिती आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
हेही वाचा : “एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे म्हणजे गारद्यांची टोळी, वसुली करायला…” उद्धव ठाकरेंची टोलेबाजी
“ते जोपर्यंत बघत नाहीत, तोपर्यंत ठिक आहे. बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे. त्यामुळे आपल्या मर्यादेत आणि कुवतीत राहा. काल भाषणात म्हणाले, मणिपूरला जाण्याची हिंमत दाखवा. अरे मणिपूर काय मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक करून टाकला. तुम्ही वर्षावरून मंत्रालयात जाऊन दाखवलं नाही,” असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
हेही वाचा : “मोदींनी कोविड लस तयार केली मग संशोधक गवत…”, फडणवीसांचा ‘तो’ VIDEO दाखवत उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी!
“आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजपा महायुती म्हणून लढणार आहोत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरकार काम करत आहे. ‘शासन आपल्या दारी’ प्रकल्प सुरू आहे. आपण त्यांच्यामधील दुवा बनून लोकांपर्यंत पोहचा. एका छताखाली सर्व दाखले मिळत आहेत, हे लोकांना सांगा,” असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलं आहे.