मुंबईतील कोस्टल रोडच्या एका लेनचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. या सागरी मार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणा यावेळी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भाषणात केली. यावेळी एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी कोस्टल रोडचं श्रेय ठाकरे गटाकडून घेण्यावर टीका केली असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली.

“कोस्टल रोड मुंबईकरांसाठी गेम चेंजर”

कोस्टल रोड मुंबईकरांसाठी गेम चेंजर ठरणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले. “मुंबईकरांचं कोस्टल रोडचं स्वप्न होतं. हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे. हा फक्त रस्ता नाही. याचं महत्त्व जनतेला कळतंय. असे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचं काम सरकारकडून केलं जातंय”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा

“केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे”

“केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे असं आपण म्हणतो. पण पूर्वीच्या सरकारचा कदाचित यावर विश्वास नव्हता. त्यामुळे त्याला विलंब होत होता. सोशल मीडियावर ‘आम्ही केलेलं काम’ असं म्हणून कुणीतरी प्रचार करतंय. पण त्यात अडथळे किती घातले गेले? हा प्रकल्प कसा लांबेल हे पाहिलं गेलं”, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केला.

“न्यायालयाची प्रकरणं, परवानग्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मिळवल्या. त्यामुळे हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण होतोय. पण केलेल्या कामाचं श्रेय द्यायला मनाचा मोठेपणा लागतो. कद्रू वृत्तीचा माणूस कधीच ते श्रेय देऊ शकत नाही. गरज सरो आणि वैद्य मरो असे लोक असतात. त्याच्यावर काय बोलायचं?” असा उपरोधिक सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

Coastal Road Inauguration: मुंबईचा कोस्टल रोड छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार; उद्घाटनावेळी सरकारची मोठी घोषणा!

“कोळी बांधवांना दोन पिलरमधलं अंतर मोठं हवं होतं. ६० मीटरवरून ते आपण १२० मीटर केलं. त्या वेळचे स्थानिक आमदार, मुख्यमंत्र्यांकडे कोळी बांधव भगिनी ही मागणी घेऊन गेल्या होत्या. पण हे शक्य होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. पण आम्ही हा मुद्दा निकाली काढला. आम्ही मनाचा मोठेपणा दाखवला. ज्यांना कोतेपणा दाखवायचा होता त्यांनी दाखवला”, अशी टीकाही त्यांनी केली.

आदित्य ठाकरेंवरही अप्रत्यक्ष टीका

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. “आज काही लोक म्हणतात की मी अमुक ठिकाणी उभा राहतो, नवा मतदारसंघ शोधतो वगैरे. पण ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना तर सेवा द्या. वरळीतला हा विषय होता. कोळी बांधवांना आपण न्याय देऊ शकला नाहीत. आमदाराचं, मुख्यमंत्र्यांचं, मंत्र्यांचं काय काम असतं? सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायला पाहिजे”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.