सत्तापालट झाल्यानंतरचं पहिलेच अधिवेशन हे वादळी ठरणार याचे संकेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाले. ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे गटाला लक्ष्य केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आदींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात फलक झळकावत घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे या घोषणाबाजीच्या गोंधळामध्ये काही क्षण आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेही आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.
नक्की वाचा >> CM शिंदेंना पाहताच विरोधांकडून ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदेंसमोर चालणारा आमदार वैतागून म्हणाला, “तुम्हाला…”
‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले अन्…
महाविकास आघाडीचे आमदार विधानभवनच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी करत असतानाच घडला हा प्रकार
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-08-2022 at 09:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde walk past aditya thackeray maharashtra assembly monsoon session first day scsg