राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी प्रस्तावाल मान्यता दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे या खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर या समितीने आठ खेळाडूंना शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
या प्रस्तावानुसार धावपटू कविता राऊतची आदिवासी विकास विभागात नेमणूक केली जाईल. कुस्तीपटू संदीप यादव, तलवारबाज अजिंक्य दुधारे आणि तिरंदाज नीतू इंगोले यांची क्रीडा विभागात क्रीडा मार्गदर्शक म्हणून नेमणूक केली जाईल. वेटलिफ्टर ओंकार ओतारी आणि कबड्डीपटू नितीन मदने यांना महसूल विभागात तहसीलदारपद मिळणार आहे. तर नेमबाज पूजा घाटकरची विक्रीकर विभागात विक्रीकर निरीक्षकपदी आणि कबड्डीपटू किशोरी शिंदेची नगरविकास विभागात नेमणूक केली जाईल.
These players include Sandeep Yadav, Kavita Raut, Omkar Otari, Ajinkya Dudhare, Puja Ghatkar, Nitin Madne, Kishori Shinde and Nitu Ingole.
आणखी वाचा— ANI (@ANI) November 6, 2016
Maharashtra CM Devendra Fadnavis approves recommendations of Committee & their posting in sports,revenue,sales tax & urban development dept.
— ANI (@ANI) November 6, 2016