मुंबई आणि लगतच्या महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधाप्रकल्प राबवण्यासाठी मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाच्या ४०२८ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात वसई-ठाणे, कल्याण-डोंबीवली, अंबरनाथ-बदलापूर-कर्जत या पट्टयात विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्याचे जाहीर करण्यात आले असून त्यासाठी ६२२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कुलाबा ते सिप्झ या भुयारी मेट्रो-रेल्वे प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत.  

Story img Loader