राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यातील वाहनावर दुसरी गाडी येऊन आदळल्याने झालेल्या अपघातात चव्हाण यांच्यासह त्यांचे सचिव आणि एक पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास कांदिवली येथील टाइम्स ऑफ इंडिया प्रेसजवळ घडली. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सचिवांना मुका मार लागला असल्याचे समजते.
निवडणूक प्रचाराच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री आपल्या वाहनांच्या ताफ्यासह शनिवारी रात्री मीरा रोड येथे जात असताना कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर एका सिग्नलजवळ त्यांच्या ताफ्यातील पायलट कारवर एक वाहन येऊन आदळले. त्यामुळे ताफ्यातील अन्य वाहनचालकांचाही गोंधळ उडाला व सर्व वाहने जोरात ब्रेक लावून थांबवावी लागली. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या गाडीलाही धक्का बसला. या दुर्घटनेप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्याचे समजते. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून या घटनेबाबत कोणतीही माहिती दिली गेली नाही.
वाहन अपघातात मुख्यमंत्री किरकोळ जखमी
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यातील वाहनावर दुसरी गाडी येऊन आदळल्याने झालेल्या अपघातात चव्हाण यांच्यासह त्यांचे सचिव आणि एक पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाले.
First published on: 20-04-2014 at 12:47 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm prithviraj chavan escapes from a road accident