मुंबई:  राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याची संधी साधत अपक्ष व सहयोगी आमदारांनी नाराजी सूर लावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व सहयोगी आमदारांची बैठक घेत कशाचीही भीती न बाळगता शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी वर्षां या सरकारी निवासस्थानी शिवसेनेच्या व सहयोगी आमदारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर टक्केवारीचा आरोप करत घरचा अहेर देणारे शिवसेनेचे माजी व आता अपक्ष आमदार आशीष जैस्वाल यांच्यासह इतर अपक्ष आमदारही  बैठकीला उपस्थित होते.

राज्यसभा निवडणुकीवेळी मतदान करताना कशाचीही व कोणाचीही भीती बाळगू नका. पक्षाने एका निष्ठांवत शिवसैनिकाला राज्यसभेच्या उमेदवारीची संधी दिली आहे. कट्टर शिवसैनिक, पक्षाशी निष्ठावंत असलेल्या व्यक्तीलाही राजकारणात चांगली संधी मिळू शकते हा संदेश सामान्य माणसाला मिळावा व त्यांचा राजकारणावर विश्वास राहावा यासाठी संजय पवार यांचा विजय आवश्यक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे समजते.

सहयोगी व अपक्ष आमदारांनी नाराजीचा सूर लावल्याने शिवसेनेसाठी दुसरी जागा निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यात लक्ष घालत आहेत. आता महाविकास आघाडीच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांशीही मुख्यमंत्री ठाकरे संवाद साधणार आहेत.

केंद्रीय यंत्रणांचा वापर करून, धाकदपटशा दाखवून राज्यसभा निवडणूक जिंकण्याचा भाजपचा विचार आहे. त्यातून महाविकास आघाडी एकसंध नाही हे दाखवण्यासाठीच भाजपने तिसरा उमेदवार उभा केला आहे. पण महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असून शिवसेनेचा दुसरा उमदेवार नक्कीच विजयी होईल, असे शिवसेनेचे प्रवक्ते भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

..तर शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू – बच्चू कडू

नागपूर/अमरावती : राज्य सरकारला पाठिंबा देणारे छोटे पक्ष व समर्थित आमदारांकडून राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीची कोंडी केली जात असल्याचे चित्र विदर्भात आहे. धान, हरभरा खरेदीवर पंतप्रधानांशी चर्चा करून तोडगा न काढल्यास राज्यसभेच्या निवडणुकीत अखेरच्या पाच मिनिटांमध्ये निर्णय घेऊ, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. तर  विकास निधीवाटप करताना मंत्री टक्केवारीची अपेक्षा करतात, त्यामुळे अपक्ष आमदारांमध्ये नाराजी आहे, असा आरोप सेनेला पाठिंबा देणारे रामटेकचे अपक्ष आमदार आशीष जयस्वाल यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे-जोरगेवार भेट

चंद्रपूर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जोरगेवार यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने वापरल्या जात असलेल्या ‘घोडेबाजार’ या शब्दावर आक्षेप घेतला होता. अपक्ष आमदारांवर संशय घेतल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर सुळे-जोरगेवार भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

आमदारांची मालाडमधील हॉटेलात सोय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या व सहयोगी आमदारांना दोन बसमधून मालाड येथील एका आलिशान रिसॉर्टवर नेण्यात आले. आता मतदानापर्यंत सर्व आमदार एकत्र राहतील. आधी या आमदारांना मरिन ड्राइव्हवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचे नियोजन होते. नंतर स्थळ बदलून मालाडमधील रिसॉर्टवर नेण्याचा निर्णय झाला.

मतदानास परवानगीसाठी मलिक, देशमुख यांचा अर्ज

मुंबई : राज्यसभेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसाचा जामीन देण्याची विनंती आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सोमवारी विशेष न्यायालयाकडे केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गेल्या आठवडय़ात याच विनंतीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने दोघांच्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) देऊन अर्जावरील सुनावणी बुधवारी ठेवली आहे.