राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन वातावरण तापलेले असताना शिवसैनिक आणि राणा दांपत्यामध्ये हनुमान चालिसावरुन आमने-सामने येण्याची शक्यता आहे. राणा दांपत्याने ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यापासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा दांपत्याला धडा शिकवण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. त्यानंतर पुन्हा वर्षा बंगल्याकडे जात असताना मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना घरी जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यानंतरही शिवसैनिक मातोश्रीबाहेर ठाण मांडून बसले आहेत.

“तुम्ही कृपा करुन सगळ्याजणांनी घरी जा. इकडे कोणी हिंमत करणार नाही. तुम्ही दिवसभर इथे आहात त्यामुळे घरी जा,” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेरील शिवसैनिकांना केले आहे.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
mp shrikant shinde
“आवडत असेल किंवा नसेल महायुतीचा धर्म पाळून सुलभा गणपत गायकवाड यांचा प्रचार करा !”, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे वक्तव्य
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये दोघांनाही कायदा व सुव्यवस्था अबाधित न ठेवण्यास सांगितले आहे. पोलिस उपायुक्त मंजुनाथ यांनी त्यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावली आहे. २३ एप्रिल रोजी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा राणा दांपत्याने केली आहे.

पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतरही नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर जाण्यास तयार आहोत, मात्र निर्णय बदलणार नसल्याचे सांगितले. शनिवारी सकाळी नऊ वाजता मातोश्रीवर जाणार असून, सुरक्षा व्यवस्था बिघडू नये, अशी आमची इच्छा आहे, त्यामुळे आम्ही लोकांना तेथे येण्यास मनाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वामुळे मुख्यमंत्रीपदावर आहेत. पण आता त्यांना त्यांची विचारधाराच विसरली आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.