गेली १७ वर्षे रखडलेल्या धारावीचा पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाष्य केले आहे. धारावी पुनर्विकासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहे पण केंद्राकडून जागा न मिळाल्याने या प्रकल्पाला गती मिळालेली नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना दिली. काही योजना करायच्या मनात आहेत पण त्या आपल्या हातात नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला.

“महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अर्थसंकल्पाचा भार सोसणाऱ्या मुंबईचे पुढे रुप कसे असणार आहे हे ठरवण्याच्या दृष्टीने माझे सहकारी काम करत आहेत. मुंबईमध्ये अनेक जण येतात त्यांना अन्न आणि वस्त्र मिळतं पण दिवसभर काम केल्यानंतर पाठ टेकण्यासाठी स्वतःचे घर नसते. बाळासाहेब ठाकरेंनी १९९५ साली युतीची सत्ता आली होती तेंव्हा झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काची घरे मिळालीच पाहिजे हा विचार मांडला आणि त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प सुरु झाले. पण त्याची गती कासवाच्या गतीपेक्षाही मंद होती. आपण असं मानतो की आजोबा नारळाचे झाड लावतात आणि त्याचे फळ नातवाला मिळते. पण आता नातवंडांच्या पण पुढे दिवस जात आहेत. फळे लागत आहेत पण मलई कोण खात आहे हा संसोधनाचा विषय आहे. अनेक वर्षे जी लोक ट्रान्झीस्ट कॅम्पमध्ये राहत आहेत त्यांना घरे मिळवून देण्यासाठी ज्या काही योजना आपण आणल्या आहेत त्याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
delegation met the Governor on Monday
मुंडेंना अजितदादांचे अभय; पुरावा मिळेपर्यंत कारवाई न करण्याची भूमिका
Manikrao Kokate On Ladki Bahin Yojana
Manikrao Kokate : “कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा? हे महिलांनी ठरवावं”, लाडकी बहीण योजनेबाबत कृषीमंत्री कोकाटेंचं मोठं विधान

बाळासाहेंबांचा पुत्र म्हणून अभिमान वाटतो – उद्धव ठाकरे

“मुंबईचा एवढा दिवस सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून विचार करण्यात आला. सोन्याची अंडी दिली जात आहेत आणि ती घेऊन जातात पण कोंबडीची निगा कोण राखणार हा मुद्दा होता. मुंबईसाठी ज्यांनी घाम गाळला, रक्त सांडले त्यांचा विचार कोणीच केला नव्हता. तो विचार नुसता कागदावर न ठेवता तो प्रत्यक्षात आणणारे हे सरकार आहे याबद्दल मला बाळासाहेंबांचा पुत्र म्हणून अभिमान वाटतो,” असे मुख्यंत्र्यांनी म्हटले.

केंद्राकडे पाठपुरावा करुन त्याचा एकदा निकाल लावला पाहिजे

“काही योजना करायच्या मनात आहेत पण त्या आपल्या हातात नाहीत. आम्ही कलानगरमध्ये राहायाला आलो तेव्हा चौफेर पसलेली खाडी होती. त्यानंतर विकास होऊन ऑफिसेस उभी राहिली आणि वांद्रे कुर्ला संकुल तयार झाले. बीकेसी सर्वात महागड्या जागांपैकी एक आहे आणि त्याच्याबाजूला धारावी आहे. धारावीचा विकास होऊ शकत नाही याचे कारण दुर्दैवाने केंद्राकडून रेल्वेची जागा हस्तांतरित करण्यात आलेली नाही. केंद्राच्या ज्या जागा मुंबईत आहेत त्यांचा उपयोग कसा केला पाहिजे याचा विचार करुन चालणार नाही. केंद्राकडे पाठपुरावा करुन त्याचा एकदा निकाल लावला पाहिजे. ३०० आमदारांसाठी आपण घरे बांधणार आहोत,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

आपण विचार करुन घोषणा करतो आणि घोषणा केली की काम करतो – उद्धव ठाकरे

“झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रकल्पाला गती कशी द्यायची याचा आम्ही अनेकदा विचार केला. काही विकासकांकडून लुटमार झाल्याची माहिती मिळाली याची चौकशी केली जाईल. पण ज्यांची घरे अडली आहेत त्यांचा दोष काय? त्यामुळे आपण जी योजना करत आहोत त्यातून या सर्वांना घरे मिळण्यासाठी चालना मिळणार आहे. कारण आपण विचार करुन घोषणा करतो आणि घोषणा केली की काम करतो. त्यामुळे आता घोषणा झाल्याने काम करणार आहोत. बीडीडी चाळीतल्या कामांनाही सुरुवात झाली आहे. नोकरदार आणि शिक्षणासाठी आलेल्या महिलांसाठी आपण वसतीगृह बांधत आहोत. सफाई कामगारांसाठीही या धोरणामध्ये विचार केलेला आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Story img Loader