देशातला करोना प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढताना दिसत आहे. राज्यातली रुग्णवाढही चिंताजनक आहे. त्यातच आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत करोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. मुंबईत काल एका दिवसात रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पार देला आहे. त्यामुळे चिंता वाढली असली तरी मुंबई करोनाशी लढण्यास सज्ज असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतली आणि करोनाला धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतल्या चिंताजनक करोना परिस्थितीसंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर आज माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने लावण्यात येणाऱ्या निर्बंधांबद्दल भाष्य केलं. मुंबईत विकेंड लॉकडाउन लागणार का? याबद्दल त्यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, “आज मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि इतर मंत्री तसंच शरद पवार यांच्याशी बोलून निश्चितच निर्णय होईल. एक मात्र स्पष्ट आहे की शनिवार रविवारी मुंबईच्या बाहेर जाणारे आणि मुंबईत येणाऱ्यांची संख्या जास्त वाढते. त्यामुळे राज्याला आणि मुंबईला जो धोका आहे, त्याची पातळी ओलांडताना दिसत आहे. अशातच मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे की ते हळूवार पावलांनी पण खंबीरपणे आपली भूमिका घेत आहेत. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत निर्णय कळेल. रुग्णसंख्या वाढत असल्याने कदाचित निर्बंधांमध्ये वाढ होऊ शकते”.

हेही वाचा – महाराष्ट्रातील ४० ते ४५ टक्के रुग्ण मुंबईत; महापौर किशोरी पेडणेकरांकडून मिनी लॉकडाऊनचा इशारा

महापौर पेडणेकर पुढे म्हणाल्या, “जर आत्ताच्या परिस्थितीला गांभीर्याने घेतलं नाही, तर धोक्याची पातळी ओलांडून गेल्यावर धावपळ होणार. ती वेळीच रोखावी, अशा पद्धतीने मुख्यमंत्री सकारात्मक विचाराने चाललेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला पक्की खात्री आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे घिसाडघाईने निर्णय घेणारे मुख्यमंत्री नाहीत आणि ते धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी आणि मुख्यमंत्र्यांनी एकमेकांवर जो विश्वास टाकला आणि पहिली, दुसरी लाट रोखली. त्यात आपण इतर राज्यांच्या तुलनेत इतर देशांच्या तुलनेत आपण सुस्थितीत राहिलेलो आहोत”.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray mumbai mayor kishori pednekar covid 19 in mumbai vsk
Show comments