अंधेरी येथे शनिवारी बेस्टच्या सीएनजीवर धावणाऱ्या बसमधून अचानक गॅस गळती झाली. मात्र हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वडाळा येथून दिंडोशी येथे जात असलेल्या बेस्टच्या बसमधून अंधेरी येथे अचानक सीएनजी गॅसची गळती झाली. मात्र ही बाब वेळीच चालकाच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर गॅस गळती नियंत्रणात आणण्यात आली आणि अनर्थ टळला.
 सध्या आर्थिक तोटय़ात असलेल्या बेस्टने इंधनावरील खर्च नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या बसगाडय़ांचा समावेश केला आहे. मात्र २०११ आणि २०१२ मध्ये सीएनजीवर धावणाऱ्या बसगाडय़ांना आग लागल्याच्या दोन घटना घडल्या होत्या.

Story img Loader