देशातील कोळसा खाणींच्या व्यवसायात आघाडीवर असलेल्या ‘कोल इंडिया लि.’ या कंपनीकडील कोळशाचा साठा नेमका किती हा आता वादाचा मुद्दा ठरला आहे. कंपनीकडे त्यांच्या दाव्याप्रमाणे २१.७ अब्ज टन कोळशाचा साठा नाही तर १८.२ अब्ज टन साठा आहे. तो १७ ते २० वर्षांत संपेल, असा दावा ‘ग्रीनपीस’ या स्वयंसेवी संस्थेने केला आहे.‘कोल इंडिया’च्या अधिकृत आकडेवारीनुसार एकूण ६४ अब्ज टन कोळसा असून त्यापैकी २१.७ अब्ज टन कोळसा खाणीतून बाहेर काढता येणे शक्य आहे. पण उपलब्ध कागदपत्रानुसार कंपनीकडे २१.७ अब्ज टन नव्हे तर त्यापेक्षा १६ टक्के कमी १८.२ अब्ज टन कोळसा साठा आहे. आठ टक्क्याने विकास दर सुरू राहिला तर हा कोळसा येत्या १७ वर्षांत संपेल. तर पाच टक्क्यांनी विकास झाल्यास हा कोळसा २० वर्षांत संपेल, असे ‘ग्रीनपीस’तर्फे सांगण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे कोळसा साठय़ाबद्दलची चुकीची आकडेवारी ही गुंतवणूकदारांची फसवणूक आहे. साठय़ाच्या आधारावरच कंपनीचे आर्थिक सामथ्र्य निश्चित केले जाते. त्यामुळे या चुकीच्या आकडय़ांबाबत ‘सेबी’कडे तक्रार केल्याचेही सांगण्यात आले.

Story img Loader