मुंबईः साबणाच्या वड्यांमध्ये लपवून २५ कोटी रुपयांच्या कोकेनची तस्करी करण्याचा प्रयत्न गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) हाणून पाडला. याप्रकरणी अदिस अबाबा येथून भारतात आलेल्या ७० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बारा साबणाच्या वड्यांमध्ये लपवून तो अमली पदार्थाची तस्करी करत होता. डीआरआयने याप्रकरणी कुलाब्यातील हॉटेलमधून एका नायजेरियन महिलेलाही अटक केली आहे. आरोपीकडून कोकेन स्वीकारण्याचे काम टोळीने तिच्यावर सोपवले होते.

हेही वाचा… विक्री वाचून धूळ खात पडलेली घरे पुणे मंडळासाठी डोकेदुखी; प्रथम प्राधान्यमधील १५००हून अधिक घरांना शून्य प्रतिसाद

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध

आरोपी सुब्बुराज रेंगासामी याला सोमवारी इथिओपिया येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर डीआरआयने अटक केली. त्याच्याकडील सामानाची तपासणी केल्यावर अधिकाऱ्यांना १२ साबणाच्या वड्यांमध्ये कोकेन सापडले. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २५ कोटी रुपये आहे. कोकेन जप्त करण्यात आल्यानंतर याप्रकरणी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सुब्बुराजला याप्रकरणी अटक करण्यात आली. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी त्याला आदिस अबाबा येथून कोकेन घेऊन भारतात आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ते कोकेन त्याला कुलाबा येथील एका हॉटेलमधील महिलेस द्यायचे होते. तस्करीसाठी त्याला चांगली रक्कम मिळणार होती. त्यानंतर डीआरआयने कुलाबा येथील हॉटेलमध्ये सापळा रचून कोकेन घेण्यासाठी आलेल्या नायजेरियन महिलेला अटक केली. तिच्या ताब्यातून ४० हजार रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. ती रक्कम सुब्बुराजला देण्यास सांगण्यात आले होते.

हेही वाचा… मुंबई: पर्यटकांचे इतिहासाबाबत प्रबोधन गरजेचे-फडणवीस

या दोन आरोपींना सूचना देणाऱ्या लोकांची आणि सुब्बूराजला कोकेन पोहोचवणाऱ्या व्यक्तीची माहिती यंत्रणेला समजली आहे. या माहितीनुसार तपास यंत्रणा काम करीत आहे आणि टोळीतील इतर सदस्यांना पकडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader