मुंबई / ठाणे / पुणे : कोणत्याही पूजेमध्ये मानाचे पान असते ते ‘श्रीफळ’ किंवा नारळाला… विशेषत: गणेशोत्सवात त्याचे महत्त्व अधिकच असते. गणरायाची प्राणप्रतिष्ठा असो की नैवेद्याचे मोदक असोत, नारळ हा अविभाज्य भाग… मात्र केरळमध्ये अलीकडे झालेली अतिवृष्टी, वायनाडमधील भूस्खलन यामुळे त्या राज्यातून होणारी नारळाची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी नारळाच्या दरात शेकड्यामागे १०० ते २०० रुपये वाढ झाली आहे.
राज्यात नारळाचा पुरवठा प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांतून होतो. त्यातही केरळमधील आकाराने मोठ्या नारळांना अधिक मागणी असते. साधारण ऑगस्टपासूनच सणासुदीसाठी नारळाची मागणी वाढू लागते. हॉटेल, खानावळी, मिठाई उत्पादकांकडील नैमित्तिक खरेदी याच काळात वाढते. त्याचबरोबर घरगुती वापर, पूजा, तोरणे यासाठी नारळ लागतो. गणेशोत्सव काळात राज्यात नारळाला सर्वाधिक मागणी असते. मात्र, केरळमध्ये जुलैत झालेल्या मुसळधार पावसाने नारळाचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये सध्या दररोज तीन ते पाच गाड्यांची म्हणजेच १ ते दीड हजार पोत्यांचीच आवक होत आहे. एका पोत्यात सुमारे शंभर नारळ असतात. यापूर्वी दररोज तीन ते चार हजार पोत्यांची आवक होत होती. मंगळवारी अवघे १० हजार ५०० नारळ एपीएमसीमध्ये उतरवण्यात आले. आवक निम्म्यावर आली असून दिवाळीपर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सवातही नारळाची चणचण कायम राहण्याची शक्यता आहे. गणपतीच्या नारळपहिल्या दिवसापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. पूजा तसेच तोरणासाठी नारळाची मागणी वाढली असल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदविले आहे. घाऊक बाजारातील नारळाचे शेकड्याचे दर सरासरी २०५० रुपये आहे तर चांगल्या प्रतीचा मोठा नारळ शेकडा ३२०० रुपये आहे. मोठे व्यापारी या काळात गोदामातील नारळ देशभरात पाठवितात. शेतातील किंवा झाडावरील नारळ काढून सोलून ते शहरांकडे पाठविले जातात. मात्र किनारपट्टीवर आताही पाऊस सुरू असल्यामुळे यात अडथळे निर्माण होत आहेत.
पुण्यात फारसा परिणाम नाही
पुणे शहरात प्रामुख्याने कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून नारळ येतात. दक्षिण भारतात पावसामुळे उत्पादनात थोडीशी घट झाली आहे. मात्र, तुटवडा नसल्याचे पुणे बाजार समितीतील नारळाचे होलसेल व्यापारी दीपक बोरा यांनी सांगितले. उत्सवाच्या काळात पुणे शहरात नारळाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता नाही, दर मात्र दोन रुपयांनी चढे राहतील, असे बोरा म्हणाले.
दर्जावरही परिणाम
नवी मुंबईतील एपीएमसीत आवक होणारे नारळ आकाराने लहान असतानाही भाववाढ झालेली आहे. केरळमधील आवक घटली असून तामिळनाडूमधून येणाऱ्या नारळाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. गतवर्षी पडलेल्या दुष्काळामुळे यंदा नारळाच्या दर्जावर परिणाम झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.