सौरभ कुलश्रेष्ठ, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत सर्वसामान्यांशी पक्षाची नाळ जोडण्यासाठी ‘चाय पे चर्चा’ हा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तरुणाईला आपलेसे करण्यासाठी ‘कॉफी विथ युथ – युवा संवाद’ हा उपक्रम हाती घेतला आहे. गुरुवार २६ नोव्हेंबरला मीरा-भाईंदरमध्ये पहिला कार्यक्रम होत असून खासदार मनोज तिवारी युवक-युवतींशी संवाद साधणार आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यभरात ५१ ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्य़ांत किमान एक आणि मुंबईत सहा कार्यक्रम होतील. ठाणे शहराबरोबरच ग्रामीण भागात मुरबाडसह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर, भिवंडी आदी ठिकाणी युवा संवाद हा कार्यक्रम होईल. पुण्यात शहराबरोबरच मावळमध्ये हा कार्यक्रम होईल. २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत पहिल्या टप्प्यात ५१ युवा संवादची आखणी करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी एक ते दोन हजार युवक-युवतींची हजेरी असावी असा संघटनेचा प्रयत्न आहे, असे सूत्रांनी सांगितले.
तरुणाईच्या मनात अनेक प्रश्न असतात. सामाजिक-राजकीय-आर्थिक विषयांबाबत उत्सुकता असते. त्यासाठी अनेकदा समाजमाध्यमांतून, संकेतस्थळांवरून माहिती मिळवण्याचा प्रयत्न होतो. मात्र, ती अचूक असतेच असे नाही. त्यामुळे तरुणांच्या मनातील प्रश्नांना थेट उत्तरे देण्यासाठी, भाजप सरकार करत असलेले काम पोहोचवण्यासाठी ‘कॉफी विथ युथ – युवा संवाद’ हा उपक्रम आखण्यात आला आहे. मनोज तिवारी, पूनम महाजन, प्रीतम मुंडे, सुजय विखे-पाटील, रक्षा खडसे, गौतम गंभीर यासारखे देशातील तरुण खासदार युवक-युवतींशी संवाद साधतील. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, रणजित पाटील हे मंत्री व राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा त्यासाठी येणार आहेत, अशी माहिती भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस व या उपक्रमाचे संयोजक विक्रांत पाटील यांनी दिली.
‘कलम ३७०’ आणि ‘वन ट्रिलियन’ची अर्थव्यवस्था..
‘कॉफी विथ युथ – युवा संवाद’ या कार्यक्रमात केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने केलेली कामे, युवकांसाठी-विद्यार्थ्यांसाठी घेतलेले निर्णय याबरोबरच अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय व महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर (एक लाख कोटी डॉलर) या मुद्दय़ांवर विशेष भर देण्यात येणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था पुढील काही वर्षांत एक लाख कोटी डॉलर करण्यासाठी काय करता येईल आणि तरुणाईला त्यात कशा रीतीने भागीदार करून घेता येईल, याबाबत युवक-युवतींकडून सूचनाही घेण्यात येणार आहेत.