Colaba to BKC Mumbai Metro 3 : मुंबईतील पहिल्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसीदरम्यानचा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. आता कुलाबा ते बीकेसीपर्यंतचा दुसरा टप्पा मे २०२५ पर्यंत खुला होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं.
‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मुंबईतील ही पहिलीच भुयारी मेट्रो. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. एकीकडे प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसतानाच दुसरीकडे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच होती. त्यातच आता दुसरा टप्पाही मे महिन्यांपर्यंत सुरू होणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले, “महाराष्ट्रात मेट्रोची कामं वेगाने सुरू केली. आता मुंबई मेट्रो ३ चं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. आपण पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीकरता खुला केलाय. बीकेसी ते कुलाबापर्यंतचा दुसरा टप्पा आहे. या टप्प्यामुळे मुंबईला खऱ्याअर्थाने लाईफलाईन मिळणार आहे. यामुळे १७ लाख प्रवासी प्रवास करणार आहे. आतापर्यंत ६ लाख लोक प्रवासी प्रवास करत आहेत. कारण कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही. आपण मे २०२५ पर्यंत मेट्रो ३ खुला करणार आहोत.”
हेही वाचा >> विश्लेषण: मुंबईतील भुयारी मेट्रोच्या समस्यांची मालिका संपत का नाही? लोकार्पणाची घाई कारणीभूत?
पहिल्या टप्प्याकडे प्रवाशांची पाठ
एमएमआरसीकडून ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे बांधकाम केले जात आहे. या ३३.५ किमीमधील १२.५ किमी लांबीचा आरे ते बीकेसी असा टप्पा ७ ऑक्टोबरपासून वाहतूक सेवा सुरू झाली आहे. मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो मार्गिका असल्याने आणि उपनगरीय रेल्वे सेवा पोहोचत नाही अशा भागांना ही मेट्रो जोडत असल्याने या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. प्रत्यक्षात आरे ते बीकेसी टप्प्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
द