मुंबईः ‘कोल्ड प्ले’ आणि ‘दिलजीत कॉन्सर्ट’च्या तिकीट काळाबाजारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दिल्ली, मुंबई, जयपूर, चंदीगड, बंगळुरू येथे छापे टाकले. ‘ईडी’ने १३ ठिकाणी छापे टाकले असून तिकिटांच्या बेकायदा विक्रीसाठी समाज माध्यमांचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे.

दिलजीत दोसांझचा ‘डिल्युमिनाटी’ आणि ‘कोल्डप्ले’च्या ‘म्युझिक ऑफ द स्पीअर्स वर्ल्ड टूर’चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांना चाहत्यांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमांची अधिकृत तिकीट विक्री ‘बुक माय शो’ आणि ‘झोमॅटो लाईव्ह’मार्फत करण्यात आली. पण काही मिनिटांतच तिकिटांची विक्री झाली. त्यानंतर या तिकीटांची काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री सुरू आहे. त्याच्या माध्यमातून देशभरात चाहत्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. अनेक चाहत्यांना बनावट तिकीटे विकण्यात आली. वैध तिकिटांसाठी त्यांच्याकडून अधिक रक्कम घेण्यात आली.

Notice to Ekta Kapoor Shobha Kapoor in case of web series on Alt Balaji Mumbai news
एकता कपूर, शोभा कपूरला पोलिसांकडून नोटीस, ‘अल्ट बालाजी’वरील वेबसिरीज दाखल गुन्हा प्रकरण
Daily Horoscope 25th October in Marathi
Today’s Horoscope, 25 October : पंचांगानुसार आजचा शुभ…
municipal hospital in Bhandup, maternity in lamps,
भांडुपमधील महापालिका रुग्णालयातील प्रसूती दिव्यांच्या प्रकाशातच, महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा
tallest building in Nagpur, High court Nagpur Bench,
नागपुरातील सर्वात उंच इमारतीबाबत अखेर न्यायालयाचा निर्णय आला, आता ही इमारत…
Hospital for animals set up by Mumbai Municipal Corporation in collaboration with Tata Trust Mumbai news
प्राण्यांसाठीच्या रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण, पण उद्घाटन राहिले…; मुंबई महापालिकेने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उभारले रुग्णालय
Proposal of underground parking under Patwardhan Udyan in Bandra cancelled
वांद्रे येथील पटवर्धन उद्यानाखालील भूमिगत वाहनतळाचा प्रस्ताव रद्द
Coldplay Ticket, BookMy Show Complaint,
कोल्डप्ले तिकीट कथित काळाबाजारी प्रकरण : बुकमाय शोच्या तक्रारीवरून ३० संशयितांविरोधात गुन्हा
Delhi Crime Doctor Shot dead in Hospital
Delhi Crime : बोटाला लागलं म्हणून रुग्णालयात आले अन् डॉक्टरच्या डोक्यात गोळी झाडून गेले; दिल्लीतील नर्सिंग होममध्ये थरारक प्रकार!

हेही वाचा – लोकसेवा आयोगाने सात सहाय्यक आयुक्तांची शिफारस यादी केली जाहीर, अवमान याचिका दाखल केल्यानंतर आयोगाची सावध भूमिका

देशभरातील विविध राज्यांमध्ये याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. ‘बुक माय शो’नेही याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे काही संशयितांविरोधात तक्रार केली आहे. ‘कोल्डप्ले कॉन्सर्ट’ तिकीट काळाबाजारप्रकरणी ‘बुक माय शो’ने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात काही संशयित व्यक्ती बनावट तिकीट विक्री किंवा कॉन्सर्टच्या तिकिटांची वाढीव किंमतीने विक्री करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीमध्ये कोणाचेही थेट नाव दिले नसले तरी ३० संशयितांची नावे, मोबाइल क्रमांकांचे मालक, समाज माध्यमांवरील खाते आणि संकेतस्थळ यांची माहिती देण्यात आली आहे. या संशयितांनी वाढीव दराने तिकिटांची पुनर्विक्री केल्याचा आरोप आहे. ‘बुक माय शो’च्या विधि विभागाचे महाव्यवस्थापक पूनम मित्रा यांनी दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ३१८ (४), ३१९ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६ (क) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – पनवेलमधील आरोपीच्या घरातून पिस्तुल जप्त

‘ईडी’ने याप्रकरणी देशभरात दाखल गुन्ह्यांच्या आधारावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक अधिनियम २००२ (पीएमएलए) अंतर्गत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) दिल्ली, मुंबई, जयपूर, बंगळुरू आणि चंदीगड येथे १३ हून अधिक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत बनावट तिकिटांच्या विक्रीशी संबंधित संशयित व्यक्तींचे मोबाइल फोन, लॅपटॉप, सिम कार्ड इत्यादी माहिती आणि सामग्री जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत बेकायदा तिकीट विक्रीच्या जाळ्याचा तपास आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात येत असल्याचे ‘ईडी’कडून शनिवारी सांगण्यात आले. याप्रकरणी इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम या समाज माध्यमांद्वारे बेकायदा तिकिटांची विक्री करण्यात आल्याचे समजते. याबाबत ‘ईडी’ अधिक तपास करीत आहे.