मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान कायम आहे. शहराच्या तुलनेत उपनगरात थंडी अधिक असून गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात चांगलाच गारठा जाणवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उकाड्याची जाणीव सहन करणाऱ्या मुंबईकरांना गेल्या दोन दिवसांपासून गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे. सकाळी ११ च्या सुमारासही वातावरणात गारवा जाणवतो. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी १८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची तर सांताक्रूझ केंद्रात १५.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, हिवाळ्यातील आत्तापर्यंतचे निचांकी तापमान मंगळवारी नोंदविले गेले.

हेही वाचा – मराठा आंदोलन आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त, मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सकाळी किमान तापमान १ अंशांनी वाढले असले तरी उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सकाळचा गारठा कायम आहे. शुक्रवारपर्यंत किमान तापमान १६ ते २० अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील दोन दिवस दोन्ही केंद्रांवरील किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदले गेले आहे.

हेही वाचा – समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, गुरुवारी पहाटे खासगी बसला कंटेनरची धडक

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी २० अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात १७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली‌. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सकाळी किमान तापमान काही अंशी वाढले असले तरी उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सकाळचा गारठा कायम आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold weather in mumbai on thursday mumbai print news ssb
Show comments