मुंबई : कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकीट काळाबाजारीप्रकरणी बुक माय शोने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात काही संशयित व्यक्ती बनावट तिकीट विक्री किंवा कॉन्सर्टच्या तिकिटांची वाढीव किंमतीने विक्री करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटामागे सिमीचा हात, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा विशेष न्यायालयात दावा

हेही वाचा – बदलापूर चकमक प्रकरण : शिंदेला लागलेली गोळी कशी सापडली नाही ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना प्रश्न

तक्रारीमध्ये कोणाचेही थेट नाव दिले नसले तरी ३० संशयितांची नावे, मोबाईल क्रमांकांचे मालक, समाज माध्यमांवरील खाते आणि संकेतस्थळ यांची माहिती देण्यात आली आहे. या संशयितांनी वाढीव दराने तिकीटांची पुनर्विक्री केल्याचा आरोप आहे. बुक माय शोच्या विधी विभागाचे महाव्यवस्थापक पूनम मित्रा यांनी दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ३१८(४) आणि ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६(क) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे आणि तपास सुरू केला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.