मुंबईः महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण वायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाहु नगर पोलिसांनी पीडित मुलाच्या दोन मित्रांविरोधात लैंगिक अत्याचार, खंडणी, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी १९ वर्षीय पीडित तरुणाला मारहाण करून त्याचेही चित्रीकरण केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे ही वाचा…१,४३८ कोटींचे बँक फसवणूक प्रकरण: ईडीकडून ४३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

पीडित तरुणाला ९ सप्टेंबर रोजी एका आरोपी तरूणाने मारहाण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याचे मोबाइलवर चित्रीकरणही केले. ते चित्रीकरण वायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तक्रारदाराच्या खिशातील सर्व पैसे काढून घेतले. तसेच आणखी १० हजार रुपये देण्यास सांगितले. अन्यथा संंबधित चित्रीकरण समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी दिली.

हे ही वाचा… डान्सबारमधील अश्लील नृत्यास प्रोत्साहन गुन्हा नाही, एकाविरोधातील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

तसेच दुसऱ्या आरोपीने मारहाण करतानाचे चित्रीकरण केले. तसेच त्यानेही पीडित तरुणाला मारहाण केली. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलाने शाहु नगर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी बुधवारी आरोपींविरोधात लैंगिक अत्याचार, खंडणी, मारहाण करणे, धमकावणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दोन्ही तरूण १८ ते १९ वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College student sexually assaulted and threatened to go viral and demanded money mumbai print news sud 02