मुंबई : रंगभूमीवरील तरुण कलाकौशल्यांना मंच मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नव्या पर्वाची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयीन वर्तुळात तिचे जोरदार स्वागत होत आहे. येत्या २ डिसेंबरपासून मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक अशा आठ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी होत आहे. त्यासाठी युवा रंगकर्मीनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
महाविद्यालयीन कलाकार मंडळी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेकडे आपले गुणकौशल्य दाखवण्याची एक मोठी संधी म्हणून पाहतात. कला क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे होतकरू रंगकर्मीही आपली प्रतिभा ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मोठय़ा व्यासपीठावरून मोठय़ा रसिक समुदायापर्यंत पोहोचविण्यासाठी उत्सुक आहेत. गेली दोन वर्षे युवा रंगकर्मीची ही संधी हुकली होती. परंतु, ‘लोकांकिका’ची घोषणा होताच या मंडळींच्या उत्साहाला भरते आले आहे. स्पर्धेच्या एकूण कार्यक्रमाबद्दल, स्पर्धेत कोणती एकांकिका सादर करायची, लेखक कोण, दिग्दर्शक कोण याबद्दलच्या चर्चा, एकांकिकेसाठी कलाकार निवडीपासून ते तंत्र-साहाय्य वगैरेची जमवाजमव कशी करावयाची, याबाबत चर्चा आता रंगू लागल्या आहेत. प्रवेशिका सादर करण्याची लगबग सुरू झाली आहे. या सगळय़ातून तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, पॉवर्ड बाय पार्टनर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, टॅलेन्ट पार्टनर आयरिस प्रॉडक्शन आणि ‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने होत असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धे’तून अनेक तरुणांना नाटक, दूरचित्रवाणी, चित्रपट क्षेत्राची दारे खुली झाली आहेत. या अर्थानेही ही स्पर्धा महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची ठरली आहे.
विभागीय अंतिमच्या तारखाही जाहीर
यंदाच्या ‘लोकांकिका स्पर्धे’च्या विविध केंद्रांवरील प्राथमिक फेरीच्या तारखा यापूर्वीच जाहीर झालेल्या आहेत. प्रवेशिका भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असून ती २८ नोव्हेंबर आहे. येत्या २ डिसेंबरपासून विविध केंद्रांवर स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या सुरू होणार आहेत. या विभागीय फेऱ्यांमध्ये विविध केंद्रांतून विजेत्या ठरणाऱ्या आठ एकांकिकांची महाअंतिम फेरी मुंबईत रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये १७ डिसेंबरला होणार आहे.
मुंबई: १० डिसेंबर
पुणे : ९ डिसेंबर
ठाणे : ८ डिसेंबर
नाशिक : ९ डिसेंबर
रत्नागिरी : १४ डिसेंबर
कोल्हापूर : १० डिसेंबर
औरंगाबाद : १२ डिसेंबर
नागपूर : ८ डिसेंबर
संपर्क क्रमांक
मुंबई विभाग : मकरंद पाटील- मो. क्र. ९८९२५४७२७५.
ठाणे केंद्र संपर्क : १) कमलेश पाटकर (ठाणे)- मो. क्र. ९८२०६६४६७९, २) समीर म्हात्रे (नवी मुंबई)- मो. क्र. ९६१९६३०५६९, ३) राकेश राणे (वसई- विरार)- मो. क्र. ७७९८३१५७३७, ४) नीरज राऊत (पालघर)- ९९६०४९७३७८, ५) अरविंद जाधव (डोंबिवली- कल्याण)- ९८२०७५२४५९.
पुणे केंद्र संपर्क- रामचंद्र शेंडे- मो. क्र. ९८३३२१४४६०.
औरंगाबाद केंद्र संपर्क : सदाशिव देशपांडे- मो. क्र. ९९२२४००९७६. कोल्हापूर केंद्र संपर्क : संदीप गिरीगोसावी- मो. क्र. ९६५७२५५२७७. नागपूर केंद्र संपर्क : गजानन बोबडे- मो. क्र. ९८२२७२८६०३. नाशिक केंद्र संपर्क : प्रसाद क्षत्रिय- मो. क्र. ८०८७१३४०३३.
रत्नागिरी केंद्र संपर्क : राजू चव्हाण- मो. क्र. ९४२३३२२११६.
(प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर)