संलग्नता मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेकरिता महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाकडे कोटय़वधी रुपये शुल्कापोटी जमा करूनही गेल्या चार वर्षांत एकाही अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयाला संलग्नता देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या चुकारपणा व दफ्तर दिरंगाईला विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी ‘मुंबई युनिव्र्हसिटी अॅण्ड कॉलेज टिचर्स असोसिएशन’ (मुक्ता) या संघटनेने केली आहे. संलग्नता नसलेल्या महाविद्यालयांना कॅम्पमध्ये (केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया) सहभागी होता येत नाही. ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता केल्याने मुंबईतील फारच थोडय़ा महाविद्यालयांकडे कायम संलग्नता आहे. पण, ही महाविद्यालये प्रवेशांपासून वंचित राहू नये म्हणून प्रत्येक महाविद्यालयाला त्या त्या शैक्षणिक वर्षांपुरती तात्पुरती संलग्नता दिली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा