मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर रात्री भीषण अपघात झाला आहे. चार गाड्या आणि एक रुग्णवाहिका एकमेकांवर आदळून झालेल्या या अपघातात पाचजणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. अपघात इतका भीषण होता की, पाचही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, सी-लिंकवर एका कारचा अपघात झाला होता. यावेळी जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचली होती. पण याचवेळी तेथून जाणाऱ्या तीन गाड्यांनी अपघातग्रस्त वाहनासह रुग्णवाहिकेलाही धडक दिली. यानंतर सी-लिंकवर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
Why are indigenously made Dhruva helicopters frequently involved in accidents
स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकाॅप्टर्सचे वारंवार अपघात का होत आहेत?
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी

अपघातात जखमी झालेल्या चार ते पाच लोकांची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. सर्व जखमींवर उपचार सुरु असून, त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आलं आहे.

पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.

Story img Loader