फेब्रुवारीमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला दरम्यान हार्बर मार्गावर होणाऱ्या मेगा ब्लॉकच्या वेळी उपनगरी गाडय़ा मेन लाइनने कुर्ला ऐवजी ठाणे मार्गे वाशी व पनवेलला जाणार आहेत. यामुळे जास्त वेळ प्रवास करावा लागणार असला तरी वाहतूक सुरू राहून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ठाणे येथे झालेल्या रेल्वे मार्गातील सुधारणांमुळे प्रवाशांना दोनवेळा गाडी बदलावी लागणार नाही. ठाणे येथे जलद मार्गावरून पाचव्या-सहाव्या मार्गावर जाण्यासाठी सांधे जोडणीचे काम सध्या सुरू असून जानेवारी अखेपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे असे मध्य रेल्वेचे जनसंपर्काधिकारी विद्याधर मालेगावकर यांनी सांगितले.

Story img Loader