सिडको आणि क्रेडाई-एमसीएचआयच्या सदस्यांचा समावेश
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायाला आणि विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सिडको आणि क्रेडाय-एमसीएचआयच्या चार सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती नवी मुंबईतील विकासाच्यादृष्टीने सूचना करणार असून विकासादरम्यान निर्माण होणाऱ्या समस्या सोडवणार आहे.
सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये माजी मुख्य सचिव, प्रधान सचिव (नगरविकास विभाग-२) सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको आणि क्रेडाय-एमसीएचआयचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. क्रेडाय-एमसीएचआयकडून सदस्य राजेश प्रजापती आणि आर. केवल वलंभिया यांचा समावेश या समितीत केली जाण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. सिडकोच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधा प्रकल्प साकारून हा विकास साधला जात आहे. सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, नैना, कॉर्पोरेट पार्क इत्यादी प्रकल्पांचा यात समावेश आहे. त्याचवेळी निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प राबविण्यासाठी सिडकोने विविध खासगी विकासकांना भाडेतत्त्वावर जमिनीचे वाटप केले आहे. तसेच या भूखंडांवर आणि लगतच्या भागात नागरी सुविधांसह आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारीही सिडकोची आहे. अशावेळी रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास करणे सोपे व्हावे यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमुळे नवी मुंबईत गृहप्रकल्प राबविताना खासगी विकासकांना अनेक अडचणी येतात. या अडचणी सोडविणेही आता सोपे होणार असल्याचे म्हणत क्रेडाय-एमसीएचआयचे अध्यक्ष अध्यक्ष बोमण इराणी यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.