मोनो आणि मेट्रो रेल्वे बेस्टच्या स्मार्टकार्डशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत दोन्ही रेल्वेच्या प्रशासनाशी चर्चा सुरू असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी दिली.
परदेशात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध परिवहन सेवा एकमेकांशी जोडल्या जात आहेत. परिणामी एकाच स्मार्टकार्डचा वापर करून विमान, रेल्वे आणि बसमधून प्रवास करता येतो. ही बाब लक्षात घेऊन बेस्टच्या स्मार्टकार्डशी मोनो आणि मेट्रो रेल्वे जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे गुप्ता म्हणाले. जिनिव्हा येथे २४ ते ३० मे दरम्यान सार्वजनिक परिवहन महामंडळ, आंतरराष्ट्रीय संघ जागतिक परिषद, शहर परिवहन या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनास गुप्ता उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा