विक्रोळी येथे खाडी किनारी सोमवारी एक संशयास्पद बोट आढळून आल्याने खळबळ उडाली. विक्रोळी पोलीस तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक अलिबाग येथे रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.  
विक्रोळी येथे असलेल्या खाडी किनारी स्थानिक मच्छीमारांना ही संशयास्पद बोट आढळून आली. मच्छीमारांनी विक्रोळी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही बोट रिकामी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ही बोट एका महिलेच्या मालकीची असल्याचे समजते. ही बोट चोरीची असण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader