ओव्हरहेड वायरमध्ये उपनगरी गाडीचा पेंटोग्राफ अडकल्याने बुधवारी हार्बर मार्गावरील वाहतूक सकाळी दोन तास ठप्प झाली होती.
पहाटे ४.५० वाजता पनवेलहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी गाडीचा पेंटोग्राफ कुर्ला येथे ओव्हरहेड वायरमध्ये अडकला आणि गाडी स्थानकातच बंद पडली. पेंटोग्राफ सोडवण्यामध्ये तब्बल दोन तास गेल्यावर गाडी कुर्ला कारशेडमध्ये दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे सकाळी पनवेलहून सीएसटीकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. वाहतूक अर्धा ते पाऊण तास विलंबाने सुरू होती. सकाळी दोन तास वाहतूक बंद असताना पनवेल-वाशीकडील प्रवाशांना ट्रान्स हार्बरमार्गे ठाण्याला येऊन पुढे सीएसटीकडे प्रवास करण्याची परवानगी असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत होते. तसेच चुनाभट्टी आणि गुरू तेगबहादूर नगर स्थानकावरील प्रवाशांनाही मेन लाइनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. यामुळे ठाणे ते सीएसटी दरम्यान मेन लाइनवर प्रवाशांची गर्दी मोठय़ा प्रमाणात झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा