मुंबई : रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखणे आणि स्थानकातील प्रवास अधिकाधिक सुकर होण्यासाठी पश्चिम रेल्वेने पाच स्थानकात आणखी प्रत्येकी एक पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०३३ पर्यंत हे पूल बांधण्यात येतील. नुकतीच अंधेरी स्थानकात पश्चिम रेल्वेने स्कायवॉकची उभारणी केली.

दादर, खार, नायगाव, वसई रोड, नालासोपारा या स्थानकांमध्ये पूल बांधण्यात येणार आहेत. या आर्थिक वर्षात ग्रॅण्ट रोड, अंधेरी, विरार, माटुंगा, सांताक्रुझ, भाईंदर, अंधेरी स्कायवॉक आणि बांद्रा स्कायवॉकची उभारणी करण्यात आली आहे. स्थानकातील प्रवास सुकर होण्यासाठी आणि रेल्वे रूळ ओलांडताना मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. स्थानकात पादचारी पूल उपलब्ध करण्याचे नियोजन केले जाते. स्थानकातही रुळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक असते. अशी ठिकाणे ओळखून पूल बांधण्यात येतात.  १ ऑगस्टपासून पश्चिम रेल्वेने अंधेरी स्थानकात बांधलेला स्कायवॉक प्रवाशांसाठी सुरू केला. स्काय वॉक ६ मिटर रुंद आणि ९८ मिटर लांबी आहे. स्कायवॉक बांधण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपये खर्च आला.

Mumbai central railway block loksatta news
मुंबई: मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी

ऑगस्ट २०२३ पर्यंत आणखी १७ पादचारी पूल मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून  बांधण्यात येणार आहेत. या कामांनाही गती दिली जात आहे. यामध्ये १३ पूल हे मध्य रेल्वेवर आणि ऊवर्रित पश्चिम रेल्वेवर बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.